गलवानमध्ये चीनचे ६० सैनिक ठार झाले ! – अमेरिकेतील नियतकालिकाचा दावा  

लडाखमधील गलवान खोर्‍यात १५ जूनच्या रात्री भारत आणि चीन यांच्या सैन्यात झालेल्या धुमश्‍चक्रीत चीनचे ४० ते ४५ नव्हे, तर ६० सैनिक ठार झाले, असा दावा अमेरिकेतील ‘न्यूज वीक’ या नियतकालिकाने केला आहे.

पाकमध्ये ईशनिंदा कायद्याद्वारे अल्पसंख्यांकांच्या मानवाधिकारांचे हनन  !

पाकिस्ताने त्याची भारतद्वेषी भाषा बंद केली पाहिजे. पाक स्वतःच्या देशात ज्या प्रमाणे अल्पसंख्यांकांशी वर्तणूक करत आहे, ते पाहून त्याने स्वतःचे मूल्यांकन केले पाहिजे. पाक ईशनिंदासारखे कायदे बनवून अल्पसंख्यांकांच्या मानवाधिकारांचे हनन करत आहे.

काही जण मरणारच आहे ! – ब्राझीलचे राष्ट्रपती

‘मला क्षमा करा. काही जण मरणारच आहेत. वाहतुकीमुळे एखाद्याचा मृत्यू होतो; म्हणून तुम्ही एका चारचाकी वाहनाचा कारखाना बंद करू शकत नाही’, असे विधान ब्राझीलचे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांनी कोरोनाच्या प्रादुर्भावाविषयी त्यांच्या घेण्यात आलेल्या एका मुलाखतीत व्यक्त केले.

आतंकवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेची १ ट्रिलियन डॉलरची हानी ! – पंतप्रधान मोदी

विकास, शांतता आणि भरभराट यांना आतंकवादाचा सर्वांत मोठा धोका आहे. आतंकवादामुळे विकसनशील देशांची आर्थिक वृद्धी १.५ टक्क्यांनी न्यून झाली आहे.