युएईमधून प्रत्यार्पण झालेल्या १४ भारतीय जिहाद्यांचे देशात इस्लामिक स्टेटचे केंद्र उभारण्याचे प्रयत्न उघड

गेल्या आठवड्यात संयुक्त अरब अमिरातीने (‘युएई’ने) १४ भारतीय जिहाद्यांचे प्रत्यार्पण करत त्यांना भारताच्या कह्यात दिले होते. तत्पूर्वी युएईने त्यांना ६ मास कारागृहात ठेवले होते.

तमिळनाडूमध्ये ‘अंसारूल्ला’ या जिहादी आतंकवादी संघटनेच्या तळांवर एन्आयएच्या धाडी

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने चेन्नई आणि नागपट्टिणम् येथे ‘अंसारूल्ला’ या जिहादी आतंकवादी संघटनेच्या ३ ठिकाणांवर धाड टाकली. भारतात ‘इस्लामी राष्ट्र’ स्थापन करण्यासाठी कार्यरत असणार्‍या जिहादी आतंकवादी संघटनांविषयी देशातील पुरो(अधो)गामी आणि निधर्मी तोंड का उघडत नाहीत ?

साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल प्रसाद पुरोहित आणि सुधाकर चतुर्वेदी यांना १ आठवडा सुनावणीला अनुपस्थित रहाण्याची सूट

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्आयएच्या) विशेष न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोटाच्या खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल प्रसाद पुरोहित आणि सुधाकर चतुर्वेदी यांना १ आठवडा सुनावणीला अनुपस्थित रहाण्याची सूट दिली आहे.

राष्ट्रद्रोही झाकीर नाईकविरोधात युवावर्गाची दिशाभूल करून त्यांना आतंकवादी कारवायांसाठी उत्तेजन देण्याचा आरोप !

गुन्हे करून आरोपी पसार झाल्यावर त्यांच्यावर गुन्हे नोंदवून हतबलता दर्शवणारे नव्हे, तर गुन्हा करण्याचे कोणाचे धैर्यच होणार नाही, असा धाक निर्माण करणारे शासनकर्ते आणि पोलीस मिळण्यासाठी हिंदु (ईश्‍वरी) राष्ट्राविना पर्याय नाही !

श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी केरळमधील दोघे एन्आयएच्या कह्यात

श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) केरळच्या कासारगोडमधून २ तरुणांना कह्यात घेतले आहे. ‘भारतीय तरुण इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी होणार नाहीत’, असे म्हणणार्‍या भाजपच्या गृहमंत्र्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

भारतातून आतंकवाद्यांच्या सहभागाविषयी चौकशीस आरंभ

श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांमध्ये आतंकवाद्यांना भारतातून साहाय्य मिळाले होते का, याची चौकशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एनआए) करत आहे. या प्रकरणी एन्आयए श्रीलंकेच्या सुरक्षायंत्रणांना सहकार्य करत आहे.

एन्आयए न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंह यांची उमेदवारी रहित करण्याची मागणी फेटाळली

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंह यांची उमेदवारी रहित करण्याच्या मागणीसाठी केलेली याचिका फेटाळून लावली आहे.

साध्वी प्रज्ञासिंह यांची उमेदवारी रहित करणे आमच्या अधिकारात येत नाही ! – एन्आयए

भोपाळ येथील साध्वी प्रज्ञासिंह यांना भाजपने उमेदवारी दिल्यावर मालेगाव स्फोटातील एका पीडित व्यक्तीकडून त्यांची उमेदवारी रहित करण्याची मागणी करणारी याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे.

(म्हणे) ‘एन्आयएच्या आतंकवाद्यांच्या सूचीमध्ये अनेक हिंदूंचा समावेश !’

काँग्रेसनंतर आता हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमांचा हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न ! ‘हिंदु आतंकवाद’ असे काही असते, तर आतापर्यंत एकतरी काँग्रेसवाले किंवा इतर धर्मीय जिवंत राहिले असते का ? आणि प्रसारमाध्यमांना हिंदूंना आतंकवादी म्हणण्याचे धारिष्ट्य झाले असते का ?

काँग्रेसनंतर आता प्रसारमाध्यमांचा हिंदूंना ‘आतंकवादी’ ठरवण्याचा प्रयत्न जाणा !

महाराष्ट्र टाइम्स, इंडियन एक्सप्रेस तसेच अन्य काही वृत्तसंकेतस्थळांनी ‘एन्आयए’च्या आतंकवाद्यांच्या सूचीमध्ये हिंदूंचाही समावेश आहे आणि हिंदूंनाही शिक्षा झाली आहे’, असे वृत्त देऊन ‘हिंदूही आतंकवादी आहेत’, असे दाखवण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न केला आहे.


Multi Language |Offline reading | PDF