सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर यांच्या जन्माआधी आणि नंतर त्यांच्या आईला आलेल्या अनुभूती अन् संत आणि साधक यांनी काढलेले कौतुकोद्गार !

वामन द्वादशी म्हणजेच भाद्रपद शुक्ल पक्ष द्वादशीला (१० सप्टेंबर २०१९ या दिवशी) चि. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय १ वर्ष) याला ‘सनातनचे दुसरे बालसंत’ म्हणून घोषित करण्यात आले. त्यानिमित्ताने पू. वामन यांची आई सौ. मानसी राजंदेकर यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आणि अन्य सूत्रे येथे देत आहोत.

बालसंत वामन यांच्या संदर्भातील लिखाण करतांना त्यांच्या आईला लक्षात आलेले सूत्र आणि व्यक्त केलेली कृतज्ञता !

‘मला पू. वामन यांचे लिखाण करण्यासाठी पुष्कळ अडचणी आल्या. केवळ गुरुकृपेने हे लिखाण पूर्ण झाले. मी सलग २ रात्री ११.३० ते २.३० या वेळेत लिखाण केले. लिखाण करत असतांना ‘वामन हे माझे बाळ आहे’, असे मला जाणवत नव्हते आणि ‘त्याचा उल्लेख आदरार्थी करावा’, असे वाटत होते…..

पू. वामन यांच्याविषयी कुटुंबीय, नातेवाईक आणि समाजातील इतर व्यक्ती यांना जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

पू. वामन यांच्या जन्मानंतर प्रत्येक मासात त्यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत. यावरून त्यांचे अद्वितीयत्व दिसून येते ! ‘गर्भधारणा झाल्यापासूनच, म्हणजे पहिल्या मासापासूनच ‘हे बाळ पुष्कळ निर्गुण स्तरावरील आहे’, असे मला जाणवत होतेे.

रामनाथी आश्रमातील वास्तव्यात ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. सान्वी लोटलीकर (वय साडेचार वर्षे) हिच्यामध्ये झालेले पालट !

‘आम्ही २७.४.२०१८ ते २१.५.२०१८ या कालावधीत एका विवाहानिमित्त रामनाथी आश्रमात आलो होतो. येथे आल्यावर माझी मुलगी चि. सान्वी लोटलीकर हिच्यामध्ये जाणवलेले पालट येथे देत आहे.

संतांनी दिलेल्या खाऊची चैतन्यमय वेष्टने भक्तीभावाने जतन करून त्यांद्वारे त्यांच्या अनुसंधानात रहाणारी सोलापूर येथील कु. सुवर्णा श्रीराम (वय १६ वर्षे) !

श्री गुरुमाऊली परात्पर गुरु डॉ. आठवले, मला तुमची पुष्कळ आठवण येते; म्हणून तुमच्या या चैतन्यमयी आठवणी ! जशी मीरा श्रीकृष्णाची सारखी आठवण काढत असे, तशी मी माझ्या श्रीकृष्णरूपी गुरुमाऊलीची आठवण काढत असते.

वास्को (गोवा) येथील दैवी बालिका चि. किमया सजल बोरकर (वय २ वर्षे) हिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !

शांत, समंजस आणि देवाची ओढ असणारी वास्को (गोवा) येथील दैवी बालिका चि. किमया सजल बोरकर हिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असल्याचे येथील एका अनौपचारिक सत्संगात घोषित करण्यात आले.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला सोमनाथ, गुजरात येथील चि. ओम चंद्रकांत कोलगे (वय ३ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. ओम कोलगे हा एक आहे !

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कल्याण (जिल्हा ठाणे) येथील चि. श्रीमयी सुधीर महाडीक (वय दीड वर्ष) !

कल्याण, जिल्हा ठाणे येथील चि. श्रीमयी सुधीर महाडीक (वय दीड वर्ष) हिची तिची आई आणि अन्य नातेवाइक यांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहोत.

६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पुणे येथील चि. गुरुअंश अमित तोंडारे (वय १ वर्ष) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. गुरुअंश तोंडारे हा एक आहे !


Multi Language |Offline reading | PDF