Kunal Kamra : कॉमेडियन कुणाल कामराविरुद्ध ३ नवीन गुन्हे नोंद !

  • मुंबई पोलिसांनी दोनदा समन्स बजावले

  • मद्रास उच्च न्यायालयाकडून ७ एप्रिलपर्यंत अटकपूर्व जामीन मान्य !

डावीकडून एकनाथ शिंदे, कुणाल कामरा

मुंबई – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गाण्यातून विडंबन करून त्यांचा अवमान केल्याच्या प्रकरणी मुंबई येथील खार पोलीस ठाण्यात स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्याविरुद्ध ३ नवीन गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पहिली तक्रार जळगाव येथे महापौरांनी प्रविष्ट केली आहे, तर उर्वरित प्रकरणे नाशिक येथील एक उपाहारगृह व्यापारी आणि व्यावसायिक यांनी प्रविष्ट केली आहे.

मुंबई पोलिसांनी कामरा याला २ समन्स बजावले आहेत. त्याला ३१ मार्च या दिवशी उपस्थित रहाण्यास सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या अध्यक्षांनी २७ मार्च या दिवशी त्याच्याविरुद्धची विशेषाधिकार भंगाची नोटीस स्वीकारली आहे. पुढील कारवाईसाठी हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठवण्यात आले आहे. २८ मार्च या दिवशी त्याला मद्रास उच्च न्यायालयाकडून ७ एप्रिलपर्यंत अटकपूर्व जामीन मिळाला आहे.