शनिशिंगणापूर येथील प्रसाद वाटपाची परंपरा बंद करणे चुकीचे ! – ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते, अध्यक्ष, राष्ट्रीय वारकरी परिषद

देवाच्या दर्शनानंतर प्रसाद दिला जातो. त्यातून चैतन्य आणि शक्ती मिळते, तसेच त्या देवतेविषयीची भक्ती वाढते. तेव्हा प्रसाद देणे चालूच ठेवले पाहिजे. प्रसाद बंद करून झाडे लावायला देणे म्हणजे हिंदूंच्या प्रथा आणि परंपरा बंद करणे होय. या पातकापासून दूर रहावे. राष्ट्रीय वारकरी परिषद याचा जाहीर निषेध करत आहे.

शनिशिंगणापूर येथील मंदिरात प्रसादाऐवजी लिंबाचे रोप वाटण्याचा निर्णय !

प्रसादाऐवजी रोपांचे वाटप करणे कितपत योग्य ? ‘प्रसादामध्ये देवतेचे चैतन्य असते. तो भावपूर्ण ग्रहण करणार्‍यास चैतन्याचा लाभ होतो’, असे धर्मशास्त्र आहे. त्यामुळे  धर्मपरंपरा जपण्यासाठी हिंदूंनीच आता प्रयत्न करणे आवश्यक ! अन्य पंथियांच्या श्रद्धास्थळी कधी असे निर्णय घेतल्याचे ऐकले आहे का ?

सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली नवरात्रोत्सव मंडपामध्ये अजान

एखाद्या मशिदीत किंवा चर्चमध्ये सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली कधी मंत्रोच्चार आणि मंदिराची प्रतिकृती ठेवण्यात येते का ? आत्मघाती गांधीगिरीमुळे हिंदू सर्वधर्मसमभावाचा ठेका घेऊन स्वतःचीच फसवणूक करून घेत आहेत !

असा सर्वधर्मसमभाव केवळ हिंदूंनीच दाखवायचा का ?

कोलकाता (बंगाल) येथील एका नवरात्रोत्सव मंडपामध्ये सर्वधर्मसमभाव दाखवण्यासाठी मंत्रासह अजान वाजवण्यात येत आहे. तसेच मंडपामध्ये चर्च, मशीद, मंदिर यांच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या असून चांदतारा, ओम, क्रॉस हेही लावण्यात आले आहेत.

कोलकाता के एक नवरात्रोत्सव मंडप में अजान सुनाई जा रही है और क्रॉस, चांदतारा लगाया गया हैं !

क्या अब मस्जिद और चर्च में मंत्रपाठ होगा ?

श्री दुर्गादेवीविषयी आक्षेपार्ह लिखाण ‘पोस्ट’ करणार्‍यांच्या विरोधात नालासोपारा येथे तक्रार प्रविष्ट

येथील डॉ. सुजित यादव यांना व्हॉट्सअ‍ॅपवर सांगलीतील डॉ. रावसाहेब रूपनूर यांनी २९ सप्टेंबरला दुर्गादेवीविषयी अत्यंत आक्षेपार्ह पोस्ट पाठवली. हिंदूंच्या देवतांविषयी हीन स्तराला जाऊन बरळणे म्हणजे विकृतपणाची गाठलेली परिसीमाच !

(म्हणे) ‘हिंदुत्वाचा विचार देशाला घातक !’

‘हिंदु आतंकवादा’चा बागुलबुवा उभा करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नेहमीचे तुणतुणे ! जिहादी आतंकवादी इशरत जहां हिचे समर्थन करणार्‍या, तसेच नक्षलसमर्थकांनी आयोजित केलेल्या एल्गार परिषदेला उघड पाठिंबा देणार्‍या पक्षाच्या अध्यक्षांना हिंदुत्वाचा विचार घातक वाटणारच !

जिहादी आतंकवाद नव्हे, तर ‘हिंदुत्व देशाला घातक आहे’, असे म्हणणार्‍यांना ओळखा !

‘या देशात सर्वधर्मीय संस्कृती असतांना केवळ हिंदुत्वाचा विचार देशासाठी घातक आहे’, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

केवल हिन्दुत्व का विचार देश के लिए घातक ! – शरद पवार

पवार साहब ‘जिहादी आतंकवाद देश के लिए घातक है’ ऐसे कब बोलेंगे ? 

ख्रिस्तीबहुल मेघालयमध्ये एन्.आय.टी.मधील श्री गणेशमूर्ती हटवण्यास विद्यार्थी संघटनेने भाग पाडले !

‘हिंदूबहुल देशात ख्रिस्त्यांच्या श्रद्धास्थानांमुळे धार्मिक तणाव निर्माण होत नाही, तर ख्रिस्तीबहुल राज्यात हिंदूंच्या देवतेच्या मूर्तीमुळे तणाव का आणि कोण निर्माण करत आहे ?’, हे जनतेला कळले पाहिजे ! या घटनेवरून ख्रिस्तीबहुल मेघालयामध्ये हिंदूंची स्थिती कशी आहे, हे लक्षात येते !


Multi Language |Offline reading | PDF