Samastipur Hanuman Mandir : समस्तीपूर (बिहार) येथे मुसलमानाकडून मंदिरातील हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड

  • लोकांनी धर्मांधाला पकडून खांबाला बांधले

  • संतप्त लोकांकडून जाळपोळ आणि तोडफोड 

घटनास्थळीचे छायाचित्र

समस्तीपूर (बिहार) – येथील कर्पुरी ग्राम परिसरात असणार्‍या मंदिरात प्रवेश करून एका मुसलमानाने श्री हनुमानाची मूर्ती तोडली. या घटनेनंतर संतप्त हिंदूंनी रस्त्यावर उतरून घोषणा देत जाळपोळ, तोडफोड  केली. लोकांनी या मुसलमान तरुणाला पकडून खांबाला बांधले होते. पोलिसांनी घटनास्थळी पोचून तरुणाला कह्यात घेतले आणि लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.

संपादकीय भूमिका 

या घटना रोखण्यासाठीच हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे, हे हिंदूंनी लक्षात घेऊन त्यासाठी कृतीशील व्हावे !