जो बायडेन अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप

अमेरिकेतील आगामी राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन हे अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘फॉक्स न्यूज’शी बोलतांना केला.

युएई, बहरीन आणि इस्रायल यांच्यात मैत्री करार

अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर संयुक्त अरब अमिराती (युएई) आणि बहरीन या इस्लामी देशांनी इस्रायलसमवेत मैत्री करार केला आहे.

काही देशांकडून कारोना महामारीचा आतंकवादासाठी अपलाभ उठवण्याचा प्रयत्न !  

पाक आणि चीन यांचे नाव न घेता संयुक्त राष्ट्रांत भारताची टीका : अशा टीकांचा या दोन्ही निर्ढावलेल्या देशांवर काहीही परिणाम होणार नाही, त्यांना शस्त्रांचीच भाषा समजते !

कोरोना विषाणू चीननेच निर्माण केल्याचे पुरावे सादर करणार !

मी जे पुरावे सादर करणार आहे त्यातून विज्ञानाचा गंध नसलेल्यांनाही ‘हा विषाणू मानव-निर्मितच आहे’, हे सहज समजू शकेल – चीनमधील महिला विषाणूशास्त्रज्ञ डॉ. ली मेंग यान

ट्रम्प यांचा पुढकाराने आता इस्रायल आणि बहरीन यांच्यात शांतता करार

अमेरिकेचे राष्ट्र्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढकाराने इस्रायल आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात नुकताच शांतता करार झाल्यानतंर आता पुन्हा ट्रम्प यांच्याच पुढकाराने इस्रायल आणि इस्लामी राष्ट्र असलेले बहरीन यांच्यात शांतता करार झाला.

‘आसियान’ देशांनी चीनच्या विरोधात कारवाई करावी ! – अमेरिका

दक्षिण चीन सागरात चीनच्या वाढत्या आक्रमकतेच्या विरोधात ‘आसियान’ देशांनी कारवाई करावी. अमेरिका या देशांना समर्थन देईल, असे आश्‍वासन अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पियो यांनी दिले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोनाबाधितांना सीमेवरच गोळ्या घालण्याचा उत्तर कोरियाचा आदेश ! – अमेरिकेचा दावा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उत्तर कोरियाने सीमेवर कोरोनाबाधितांना जागेवरच गोळ्या घालण्याचा आदेश त्याच्या सैन्याला दिला आहे, असा दावा अमेरिकेच्या सैन्याने केला. उत्तर कोरियाने आतापर्यंत कोरोनाची कुठलीही आकडेवारी जगासमोर आणलेली नाही.

खलिस्तानी आतंकवाद्यांमुळे कॅनडाच्या सुरक्षेला धोका ! – कॅनडामधील संस्थेचा अहवाल

भारतातील पंजाबमधील खलिस्तानच्या मागणीमागे पाक आहे. कॅनडामधील काही ठग आणि चालबाज राजकीय नेते यांनी ही मागणी जिवंत ठेवली आहे. हे खलिस्तानी आतंकवादी केवळ भारतातच नव्हे, तर कॅनडाच्या सुरक्षेलाही धोका बनले आहेत – ‘एम्.एल्. इन्स्टिट्यूट’चा अहवाल

कॅलिफोर्निया (अमेरिका) येथे जंगलात लागलेल्या भीषण आगीमध्ये ३ जणांचा मृत्यू, तर सहस्रो घरे भस्मसात

उत्तर कॅलिफोर्नियाच्या जंगलामध्ये लागलेल्या भीषण आगीमध्ये ३ जणांचा मृत्यू झाला, तर सहस्रो घरे भस्मात झाली. यामुळे सहस्रो कुटुंबांना विस्थापित व्हावे लागले. जोराच्या वार्‍यामुळे ही आग पर्वतीय भागांमध्ये आणि सुकलेल्या वनांच्या २५ मैल परिसरामध्ये पसरत आहे.

अमेरिकेतील ८५ वर्षीय माजी पादरी करत आहे अश्‍लील चित्रपटांत काम !

येथील ८५ वर्षीय माजी पाद्री नॉर्म सेल्फ आता अश्‍लील (पॉर्न) चित्रपटांमध्ये काम करत आहे. गेल्या २ वर्षांत त्याने ४ अश्‍लील चित्रपटांत काम केले आहे.