‘१०० वर्षांनी शत्रूत्व ठेवणार’, असे अप्रत्यक्षपणे सांगणारा पाकिस्तान !

पाकने बनवलेल्या त्याच्या पहिल्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणाचा काही भाग घोषित करण्यात आला आहे. त्यामध्ये ‘शेजारी देशांसमवेत चांगले व्यावसायिक संबंध बनवण्यास प्राधान्य दिले जाईल’, असे म्हटले आहे. या धोरणामध्ये भारताशी पुढील १०० वर्षे शत्रुत्व न ठेवण्याचा उल्लेख करण्यात आला आहे.’                     

कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम मुंबईतून गोळा केलेले पैसे आतंकवादी संघटनांना पुरवतो !

पाकमध्ये घुसून दाऊद याला धडा शिकवण्याची धमक भारत कधी दाखवणार ?

शहरी नक्षलवाद्यांच्या निधीचे अंमलबजावणी संचालनालयाकडून अन्वेषण होणार !

कोरेगाव भीमा दंगल आणि एल्गार परिषदेतील प्रक्षोभक वक्तव्य यांप्रकरणी अटकेत असलेले अधिवक्ता सुरेंद्र गडलिंग यांच्या आर्थिक व्यवहारांचे अन्वेषण करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने मागितलेली अनुमती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने दिली.

जालना येथे ४ स्टील व्यावसायिकांवर प्राप्तीकर विभागाच्या धाडी !

जालना येथील ४ मोठ्या स्टील कारखानदारांनी त्यांच्या व्यवसायातून कोट्यवधी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळवले; पण ते पूर्णपणे दप्तरावर न आणता रोखीत व्यवहार केले होते. याद्वारे सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाल्याचा संशय होता.

पुणे येथे आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी महिला पोलीस कर्मचार्‍याच्या विरोधात गुन्हा नोंद !

भ्रष्ट महिला पोलीस कर्मचारी आणि त्यांचे नातेवाइक यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

चीनकडून कर्ज घेण्यापूर्वी विकसनशील देशांनी दोन वेळा विचार करावा ! – बांगलादेशचे अर्थमंत्री मुस्तफा कमाल

श्रीलंकेच्या झालेल्या आर्थिक दिवाळखोरीनंतर जागा झालेला बांगलादेश !

अतीवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना प्रतिहेक्टरी १३ सहस्र ६०० रुपये हानीभरपाई देऊ ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘मागील २ मासांत राज्यात अतीवृष्टीमुळे शेतकर्‍यांची मोठी हानी झाली आहे. हे आर्थिक साहाय्य ३ हेक्टरच्या मर्यादेपर्यंत देण्यात येणार आहे.

श्रीलंकेतील रामायणाशी संबंधित स्थळांच्या पर्यटनाला चालना देणार

श्रीलंकेचे नवनियुक्त पर्यटन दूत आणि माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या यांचे आश्‍वासन

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरावर धाड !

२ वर्षांपूर्वी ट्रम्प यांनी काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे फ्लॉरिडा येथील त्यांच्या घरी नेल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

शिवसेनेचे  खासदार संजय राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी !

एक सहस्र कोटी रुपयांहून अधिक रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्याच्या प्रकरणी ‘ईडी’ने संजय राऊत यांना ३१ जुलैच्या मध्यरात्री अटक केली होती.