पू. सदाशिव (भाऊकाका) परब यांना परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या दशक्रिया विधींच्या वेळी जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती

अ. दशक्रिया विधीच्या ठिकाणी गेल्यावर तेथील वातावरण पुष्कळ चैतन्यमय जाणवून तेथे मला पिवळा आणि निळा प्रकाश दिसला. मी डोळे मिटून प्रार्थना केली, ‘येथील चैतन्याचा आपल्याला अपेक्षित असा लाभ आम्हाला घेता येऊ दे.’ 

परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या अमूल्य सत्संगातील मार्गदर्शक सूत्रे !

‘२५.१२.२०१८ या दिवशी मी कुटुंबियांसमवेत देवद आश्रमात गेलो होतो. त्या वेळी अचानक आम्हाला परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या दर्शनाचा योग आला. त्यांच्या या अमूल्य सत्संगात त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाची सूत्रे येथे देत आहे.

परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या महानिर्वाणानंतर करायच्या सेवेसंदर्भात आलेल्या अनुभूती

‘२.३.२०१९ या दिवशी परात्पर गुरु पांडे महाराज यांना रुग्णालयातून देवद आश्रमात आणण्यात आले. ३.३.२०१९ या दिवशी सकाळी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘परात्पर गुरु पांडे महाराज आणि परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे संभाषण’ अशा आशयाचा एक लेख वाचला.

परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या सत्संगात त्यांच्या सर्वज्ञतेची साधिकेला आलेली प्रचीती आणि त्यांच्या मार्गदर्शनानंतर तिला स्वतःत जाणवलेले पालट

‘वर्ष २००८ मध्ये मला देवद आश्रमासाठी बनवलेले लाडू पोचवण्याची सेवा मिळाली होती. मी आणि एक साधिका देवद आश्रमात गेलो. लाडू देऊन तेथे आम्ही सेवा केली.

रामनाथी आश्रमातील सौ. अनुश्री साळुंके यांनी परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या समवेत अनुभवलेले काही अमूल्य भावक्षण

‘माघ कृष्ण पक्ष द्वादशी (३.३.२०१९) या सायंकाळी ‘परात्पर गुरु पांडेबाबांनी (परात्पर गुरु पांडे महाराज यांनी) देहत्याग केला’, असे कळल्यावर त्यांच्याविषयीच्या अनेक आठवणी माझ्या मनात जागृत झाल्या. मी लग्नाच्या आधी देवद आश्रमात सेवा करत होते. तेव्हा प्रत्येक वेळी त्यांनी दिलेली शिकवण आणि प्रसाद यांविषयी सगळेच मला आठवले. त्यांच्या समवेत अनुभवलेले काही अमूल्य भाव क्षण पुढे दिले … Read more

देवद आश्रमातील श्री. सचिन हाके यांना परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या देहत्यागाआधी जाणवलेली सूत्रे, देहत्यागाविषयी मिळालेल्या पूर्वसूचना आणि देहत्यागानंतर आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु पांडे महाराज यांना रुग्णालयात असतांना झोप येत नव्हती. ते जागे असायचे. त्यांना शारीरिक त्रासही होत होता. २.३.२०१९ या दिवशीच्या रात्री त्यांना आश्रमात आणले.

परात्पर गुरु पांडे महाराज खोलीच्या जवळ आल्यावर त्यांच्यातील चैतन्याच्या स्रोतामुळे खोलीचे दार आपोआप उघडले जाणे

‘२४.२.२०१९ या दिवशी दुपारी १.३० वाजता पांडे महाराज नेहमीप्रमाणे देवद आश्रमात फिरत होते. तेव्हा मलाही त्यांच्या समवेत फिरण्याची संधी मिळाली. फिरणे झाल्यावर मी त्यांना त्यांच्या खोलीपर्यंत घेऊन गेलो.

परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या दशक्रिया विधीतील उत्तरक्रिया विधी पूर्ण झाल्यावर वातावरणात शक्ती आणि चैतन्य जाणवून ती शक्ती स्वतःच्या ब्रह्मरंध्रातून अनाहत चक्रापर्यंत आल्याचे जाणवणे

‘परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या दशक्रिया विधीतील (दहाव्या दिवसाचे) उत्तरक्रिया विधी झाल्यानंतर वातावरणात शक्ती आणि चैतन्य जाणवले. तेथील शक्ती हळूहळू माझ्या ब्रह्मरंध्रातून अनाहत चक्रापर्यंत आल्याचे मला जाणवले.

परात्पर गुरु पांडे महाराज यांचे गुरुरूपी प्रेम

परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या सहवासातले ते क्षण आनंदाचे ।
नात्यांच्याही पलीकडे असते संतांचे नाते मोलाचे ॥ १ ॥