चीनमध्ये सरकारच्या आदेशानंतर ‘अ‍ॅपल’ आस्थापनाने त्याच्या ‘स्टोअर’वरून ‘कुराण’ अ‍ॅप हटवले !

हे अ‍ॅप हटवण्यापूर्वी चीनमधील १० लाख लोक त्याचा वापर करत होते. जगभरात ३ कोटी ५० लाख लोक या अ‍ॅपचा वापर करत आहेत.

अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादल्याच्या प्रकरणी संशयित अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा नोंद

समाजात झपाट्याने होत असलेल्या नीतीमत्तेच्या र्‍हासाचा दुष्परिणाम !

लखीमपूर खेरी येथे कथित शेतकर्‍यांनी घडवून आणलेल्या हिंसाचारात ९ जण ठार !

ठार झालेल्यांमध्ये ४ शेतकरी आणि ४ भाजपचे कार्यकर्ते यांचा समावेश !
घटनेनंतर झालेल्या हिंसाचारात पत्रकाराचा मृत्यू

गुरुग्राम (हरियाणा) येथे सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करण्यास पोलिसांची अनुमती !

सार्वजनिक ठिकाणी कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी प्रशासनाची अनुमती घेणे आवश्यक असते. जर प्रत्येक शुक्रवारी नमाजपठणाची अनुमती घेण्यात आली असेल, तर हिंदूंनीही उद्या प्रत्येक दिवशी विविध देवतांची पूजा आणि स्तोत्रपठण करण्याची अनुमती मागितली, तर चुकीचे ठरू नये !

अल्पवयीन मुलाने संन्यास घेणे वैध ! – कर्नाटक उच्च न्यायालय

अल्पवयीन मुलगा बाल संन्यासी होऊ शकतो. त्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करता येणार नाही, असा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे. मुख्य न्यायाधीश सतीश चंद्र शर्मा आणि न्यायाधीश सचिन शंकर मकदूम यांच्या खंडपिठाने हा आदेश दिला.

छतरपूर (मध्यप्रदेश) येथील मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेर ‘सेकंड हँड जवानी’ गाण्यावर नृत्य करणार्‍या तरुणीचा बजरंग दलाकडून विरोध

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते अशा प्रकारचे अयोग्य कृत्य करतात आणि मंदिरांचे पावित्र्य अन् महत्त्व न्यून करतात, हे लक्षात घ्या !

केरळ उच्च न्यायालयाने लक्षद्वीपच्या शाळांमधील माध्यान्ह भोजनातून मांसाहारी पदार्थ हटवण्याच्या विरोधात केलेली याचिका फेटाळली !

आता साम्यवादी, निधर्मी आदींनी न्यायालयाचे भगवेकरण झाल्याचा आरोप करण्यास आरंभ केल्यास आश्चर्य वाटू नये !

भारताच्या विरोधानंतर ब्रिटनकडून ‘कोविशिल्ड’ लसीला मान्यता

भारताच्या विरोधानंतर ब्रिटनकडून ‘कोविशिल्ड’ लसीला मान्यता

भारतविरोधी ‘वर्णद्वेषा’चा धिक्कार !

२१ व्या शतकात एका सार्वभौम आणि सर्वांत मोठ्या लोकशाही राष्ट्राचा अशा स्वरूपाने होत असलेला द्वेष धिक्कारास्पद असून भारताने याच्या विरोधात कठोर पावले उचलणे आवश्यक आहे !

‘कोव्हिशिल्ड’ लस घेतलेल्या भारतियांना ब्रिटनमध्ये गेल्यास १० दिवस अलगीकरणात रहावे लागणार !

ब्रिटनकडून ‘कोव्हिशिल्ड’ला मान्यता देण्यास नकार !
भारताचा विरोध