उडुपी (कर्नाटक) येथील गुरुजी रामप्रसाद अडिग यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट

उडुपी (कर्नाटक) येथील गुरुजी श्री. रामप्रसाद अडिग यांनी १२ नोव्हेंबर २०१९ या दिवशी येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते ‘सजग’ या गस्तीनौकेचे जलावतरण

गोवा शिपयार्डने भारतीय तटरक्षक दलासाठी बांधणी केलेल्या ‘सजग’ या गस्तीनौकेचे १४ नोव्हेंबर या दिवशी केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक अन् त्यांच्या पत्नी सौ. विजया श्रीपाद नाईक यांच्या हस्ते जलावतरण करण्यात आले.

ख्रिस्त्यांच्या विरोधामुळे बेतुल येथे पूर्वापार मांडावर होणारा दिवजोत्सव हिंदूंना अन्यत्र साजरा करावा लागला !

बाराडी, बेतुल येथे मांडावर हिंदूंना धार्मिक सण साजरा करण्यास चर्च संस्थेचा विरोध आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने यंदा पूर्वापार मांडावर साजरा होत असलेला दिवजोत्सव साजरा करण्यास अनुज्ञप्ती नाकारली.

राममंदिरानंतर आता ‘घरवापसी’चे अभियान पुन्हा चालू करणार ! – विहिंप

राममंदिराचे आंदोलन सर्वोेच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर समाप्त झाल्यानंतर आता विश्‍व हिंदु परिषद पुुन्हा त्याचे ‘घरवापसी’ अभियान चालू करणार आहे.

समुद्रकिनार्‍यांवर गैरवर्तन करणार्‍या पर्यटकांवर देखरेखीसाठी आता भारतीय राखीव दलाचे पोलीस नेमणार

समुद्रकिनार्‍यांवर गैरवर्तन करणार्‍या पर्यटकांवर देखरेख ठेवण्यासाठी आता जीवरक्षकांसमवेत भारतीय राखीव पोलीस दलाचे जवान नेमण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

पोलीस हवालदाराच्या सतर्कतेमुळे कांदोळी समुद्रकिनारी बुडत्या पर्यटकाला वाचवण्यात यश

भारतीय राखीव दलाचे पोलीस हवालदार विनय च्यारी यांच्या सतर्कतेमुळे कांदोळी समुद्रकिनारी बुडत्या पर्यटकाचे प्राण वाचवण्यात यश आले. एक रशियन पर्यटक आणि अन्य दोघांच्या साहाय्याने नागपूरच्या ३० वर्षीय सचिन राऊत याला सुखरूप पाण्याबाहेर काढण्यात यश आले.

नाफ्ता जहाजामुळे भोपाळसारखी दुर्घटना होणार नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दोनापावला येथे नाफ्ता हे ज्वलनशील पदार्थ असलेले जहाज दगडात अडकून पडले आहे. या ठिकाणी भोपाळसारखी दुर्घटना होणार नाही, असे विधान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

हरमल (गोवा) येथे योग शिक्षक असल्याचा बहाणा करून अमली पदार्थाचा व्यवसाय करणारा धर्मांध पोलिसांच्या कह्यात

अल्पसंख्याक असूनही गुन्हेगारीत बहुसंख्य असलेले धर्मांध !

गुंतवणूक करण्याअगोदर सावधगिरी बाळगण्याचा रिझर्व्ह बँकेचा सल्ला

नोंदणी नसलेल्या कोणत्याही संस्थेत पैसे गुंतवण्याअगोदर लोकांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला भारतीय रिझर्व्ह बँकेने दिला आहे.

जुने गोवे येथील ‘हातकातरो खांब’ प्राचीन स्मारक म्हणून घोषित करून तिचे जतन करा !

जुने गोवे येथील ‘हातकातरो खांब’ प्राचीन स्मारक म्हणून घोषित करून त्याचे जतन करावे या मागणीचा हिंदु जनजागृती समितीने पुनरुच्चार केला आहे. हिंदु जनजागृती समितीने याविषयीचे निवेदन ११ नोव्हेंबर या दिवशी उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांना आणि काही दिवसांपूर्वी पुरातत्व खाते यांना दिले आहे.