कोरोनाची नियमावली डावलून एल्गार परिषदेला अनुमती देता येईल का ? याचा विचार करता येईल ! – नवाब मलिक, अल्पसंख्यांकमंत्री

एल्गार परिषदेला अनुमती देण्यापूर्वी या परिषदेतील चिथावणीखोर वक्तव्यांमुळे कोरेगाव भीमा दंगल झाली होती, याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा, असे जनतेला वाटते !

मुंबई – बी.जी. कोळसे-पाटील यांना पुणे येथे एल्गार परिषद घेण्याचा मूलभूत अधिकार आहे. सध्या कोरोनाच्या काळात काही नियम आहेत.

 (सौजन्य : ABP MAJHA)

हे नियम डावलून एल्गार परिषदेला अनुमती देता येईल का ? याचा विचार करता येईल, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना केले.