पीओपीविषयी ‘राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोग’ तज्ञ समिती अभ्यास करणार ! – सांस्कृतिक कार्य मंत्री अधिवक्ता आशिष शेलार
पीओपीच्या (प्लास्टर ऑफ पॅरिसच्या) श्री गणेशमूर्तीच्या वापराविषयी स्पष्टता यावी, यासाठी ‘राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोग’ तज्ञ समिती अभ्यास करणार आहे. शासन मूर्तीकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून येत्या २० मार्चला शासन न्यायालयात भूमिका मांडेल.