
सांगली, २९ मार्च (वार्ता.) – चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची गळा आवळून हत्या करून पत्नीचा मृतदेह विद्युत् मोटारीच्या लोखंडी बॉक्समध्ये लपवून ठेवल्याच्या प्रकरणी पोलिसांनी मंगेश कांबळे याला अटक केली. सांगली जिल्ह्यातील मांगले येथे ही घटना घडली. प्राजक्ता मंगेश कांबळे (वय २८ वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे.