‘व्हॅलेंटाईन डे’ या पाश्‍चात्त्य कुप्रथेच्या विरोधात प्रबोधनासाठी प्रसारसाहित्य उपलब्ध !

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना सूचना !

गावातील जत्रेमध्ये एल्ईडी स्क्रीनच्या माध्यमातून सभेचे निमंत्रण देण्यास २ गावकर्‍यांचा विरोध

हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या निमंत्रणाचा ‘डिस्प्ले’ बंद करण्यास भाग पाडले

कायद्याच्या रूपाने ‘सर्जिकल स्ट्राइक’ करून हिंदु धर्मावर आलेले हे धर्मांतराचे संकट दूर करावे लागेल ! – मनोज लासी, नगरसेवक, भाजप

आपल्या देशात ६ राज्यांत धर्मांतरबंदी कायदा लागू आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही असाच कायदा त्वरित लागू करावा ही या फेरीच्या अनुषंगाने समस्त सिंधी समाजाची मागणी आहे.

‘ऑनलाइन दर्शन’ नोंदणीसाठी १०० रुपये शुल्क आकारण्याचा घेतलेला निर्णय दुर्दैवी !

वास्तविक गेले अनेक मास श्री विठ्ठल दर्शनाची सुलभ व्यवस्था होण्यासाठी नि:शुल्क टोकन व्यवस्था करण्यात यावी अर्थात कोणत्याही प्रकारच्या दर्शनासाठी शुल्क आकारले जाऊ नये, असे निवेदनाद्वारे यापूर्वी सांगितले होते.

मराठी साहित्य संमेलन चालू होण्याच्या तोंडावर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचे त्यागपत्र

११ जानेवारीपासून चालू होणार्‍या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तोंडावर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी त्यागपत्र दिले आहे.

आंध्रप्रदेशमधील माघ मेळ्यासाठी रेल्वे आणि बस यांच्या तिकिटांमधील दरवाढ रहित करण्याची हिंदूंची मागणी !

आज हिंदूंवर होणार्‍या अन्यायाच्या विरोधात ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलनां’च्या माध्यमांतून, तसेच निवेदने सादर करून सनदशीर मार्गाने आणि व्यापक स्वरूपात वाचा फोडली जात आहे.

श्री तुळजाभवानी मंदिरातील परंपरा पायदळी तुडवत पहिल्यांदाच महिलेकडून देवीच्या चरणांना स्पर्श !

राज्याची कुलस्वामिनी मानल्या जाणार्‍या तुळजाभवानी मंदिराच्या गर्भगृहात जाऊन देवीला स्पर्श करण्याचा अधिकार विशिष्ट पुजारी सोडून इतरांना नाही; मात्र एका महिलेने ही परंपरा मोडीत काढल्याने श्रद्धाळू भक्तांमध्ये असंतोष पसरला आहे.

आतापर्यंत श्रीलंका आणि मलेशिया येथील महिलांसह १० महिलांनी भगवान अय्यप्पांचे दर्शन घेतले !

केरळमधील शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आतापर्यंत १० ते ५० वयोगटाच्या आत असणार्‍या १० महिलांनी मंदिरात प्रवेश करून भगवान अय्यप्पांचे दर्शन घेतले आहे.

केरळमध्ये भाजप खासदार आणि माकप आमदार यांच्या घरांवर बॉम्बफेक

केरळमधील कन्नूर जिल्ह्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार ए.एन्. शमसीर यांच्या निवासस्थानावर बॉम्ब फेकण्यात आला. या वेळी शमसीर घरी नव्हते. या घटनेच्या काही वेळेनंतर भाजप नेते आणि राज्यसभेतील खासदार व्ही. मुरलीधरन् यांच्या घरावरही काही अज्ञातांनी गावठी बॉम्ब फेकला.

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे होणार्‍या उद्रेकास उत्तरदायी कोण ?

शबरीमला मंदिरात २ महिलांनी प्रवेश केल्यानंतर केरळमध्ये झालेल्या हिंसाचारात माकपचे आमदार शमसीर यांच्या घरावर बॉम्ब फेकण्यात आला. मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश मिळण्याच्या सूत्राचे तेथील माकप सरकारने समर्थन केले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now