तेजस्वी विचार

पोलीस प्रशासन याकडे लक्ष देईल का?
‘स्वतःच्या खात्यातील भ्रष्टाचार उघडकीस न आणणारे पोलीस, समाजातील भ्रष्टाचार उघडकीस आणतील का ?’
मत देतांना याचा विचार करा !
‘मतदारांनो, तुम्ही निवडून दिलेल्या उमेदवाराने केलेल्या चुकांसाठी तुम्हीच उत्तरदायी असणार आहात. त्यामुळे त्या चुकांचे पाप तुम्हाला लागणार आहे. हे लक्षात घेऊन मतदान करा !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
दिनविशेष
- १३ एप्रिल : जालियनवाला बाग हत्याकांड स्मृतीदिन
- १३ एप्रिल : सेनापती तात्या टोपे बलीदानदिन
- १२ एप्रिल : आज हनुमान जयंती
- १२ एप्रिल : तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी !
राष्ट्र-धर्मविषयक चौकट
- अंधश्रद्धेने पछाडलेले विज्ञानवादी आणि प्रबळ इच्छाशक्ती अन् संकल्पशक्ती असणारे व्रताचरणी !‘आजचे युग विज्ञानाचे, म्हणजे अश्रद्धेचे. अश्रद्धा हीच श्रद्धा, निषेध हेच निमंत्रण, विध्वंस हेच सृजन ! मनु आणि धर्म यांना अंधश्रद्धा म्हणून मोकळे होणारे स्वतःच अंधश्रद्धेने पछाडलेले असतात.
- राजकीय पक्ष आणि काही संघटना यांची हिंदूंना तडजोडवादी करण्याची मानसिकता‘राज्याराज्यांत जागरूक हिंदूंच्या वाढत्या हत्या धोकादायक आहेत. यावर प्रतिक्रिया द्यायलाही अनेक जण टाळतात. राजकीय पक्ष आणि काही संघटना यांची हिंदूंना तडजोडवादी करण्याची मानसिकता आहे.’
साधनाविषयक चौकट
- देवर्षि नारदांनी सांगितलेली भक्तीची लक्षणेभक्तीच्या पुष्कळ व्याख्या आहेत; पण भक्तीची पुढील लक्षणे नारद सांगत आहेत. ‘जेव्हा सर्व विचार, शब्द आणि कृती ईश्वरार्पण होतात अन् ईश्वराची अल्पशी विस्मृतीही पुष्कळ दुःखदायक होते, तेव्हा भक्तीचा आरंभ होतो.
- कोणत्याही साधनामार्गाने साधना करत असलो, तरी अखंड साधनारत रहाणे शक्य !भक्तीयोगी नामजपाच्या माध्यमातून अखंड साधना करू शकतो. ज्ञानयोगी वाचलेल्या ज्ञानाचे चिंतन करू शकतो, कर्मयोगी असेल त्या परिस्थितीत अपेक्षारहित राहू शकतो, हठयोगी केवळ श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित करून अखंड साधनारत राहू शकतो.
- शुचिताशुचितेचे योगसूत्र आहे. शुचितेने शरिराची आसक्ती जाते, आरोग्यप्राप्ती होते, ऐश्वर्यवृद्धी होते, वैराग्य लाभते आणि ईश्वराभिमुखता प्राप्त होते.
- साधकांनो, दास्यभावाचे प्रतीक असलेल्या रामभक्त हनुमानाप्रमाणे अंतरात सेवकभाव निर्माण करून स्वतःतील अहंचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न करा !सर्व साधकांनी स्वतःत हनुमानाप्रमाणे सेवकभाव निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यामुळे त्यांच्यात नम्रता, लीनता, गुरुनिष्ठा, गुरूंचे मन जिंकण्याची आंतरिक तळमळ आदी गुण वृद्धींगत होऊन अहंचे निर्मूलन होऊ लागेल आणि साधकांसाठी ईश्वरप्राप्तीचा मार्ग सुकर होईल !