तेजस्वी विचार

-
धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंची झालेली ही वाईट स्थिती !
‘चर्च आणि मशीद येथे धर्मशिक्षण दिले जाते. याउलट मंदिरात केवळ दर्शन घेतात; म्हणून धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंची स्थिती वाईट झाली आहे.’
-
आतंकवाद्यांची ‘दहशत’ !
‘विमाने, रॉकेट, बाँब इत्यादींच्या बळावर नाही, तर तयार केलेल्या आतंकवाद्यांच्या बळावर आतंकवादी जगातील सर्व देशांत भीती निर्माण करत आहेत !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
दिनविशेष
- गुरुपौर्णिमेला १६ दिवस शिल्लक
- १३ जुलै : सनातनच्या पू. (कै.) श्रीमती सुशीला शहाणे यांची पुण्यतिथी
- गुरुपौर्णिमेला १७ दिवस शिल्लक
- १२ जुलै : अंगिरसऋषि जयंती
राष्ट्र-धर्मविषयक चौकट
- भारतियांचे राष्ट्रीय महापातक !भारतातील सामान्य जनतेला जोपर्यंत चांगले शिक्षण देण्यात येत नाही, तिला पोटभर अन्न मिळत नाही आणि तिची योग्य प्रकारे यथायोग्य काळजी घेण्यात येत नाही, तोपर्यंत कितीही राजकारण केले, तरी त्याचा काडीचाही उपयोग होणार नाही.’
- निष्क्रीयता टाळा !कोणतेही काम करतांना ‘सर्वकाही माझ्यावर अवलंबून आहे’, या भावनेने कार्य करा आणि कृती केल्यानंतर मात्र ‘सर्वकाही भगवंतावर अवलंबून आहे’, या भावनेने शरण जा. परिणामी तुम्हाला जे मिळेल ते प्रेमाने स्वीकारा. कामात सावधगिरी बाळगणे आणि आनंदी असणे, हेच आनंदी जीवनाचे रहस्य आहे.’
साधनाविषयक चौकट
- साधना संवाद (पॉडकास्ट)आजचे जीवन सुसह्य आणि आनंदी करणार्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी.
- साधकांनो, भविष्याची काळजी न करता स्वतःची साधना वाढवा !कार्य करण्यासाठी पुढच्या पुढच्या पिढ्याही तयार होतील. त्यामुळे त्याची काळजी करू नये. प्रथम स्वतः अधिकाधिक चांगले साधक होण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी मार्गदर्शन करणार्या साधकांची मदत घ्या.
- नामाची गोडी लागण्यासाठी प्रपंचाची आसक्ती न्यून करावी !एखाद्या माणसाचे तोंड आल्यावर पोटामध्ये भूक असूनसुद्धा त्याला खाता येत नाही किंवा अन्नाची चव लागत नाही. त्याचप्रमाणे आतमध्ये भगवंताचे प्रेम असूनसुद्धा आपण बाहेर प्रपंचामध्ये आसक्त असल्यामुळे भगवंताच्या नामाची गोडी वाटत नाही.
- सत्कर्म यशस्वी होण्यासाठी अहंकार आणि आसक्ती नकाे !कमलपत्र २४ घंटे पाण्यात असते; पण कधी कुजत नाही. त्याच्यावर पाण्याच्या थेंब टाकला, तर मोती ठेवल्यासारखे वाटते. पाणी चिकटत नाही; म्हणून पाण्याचा मोती होतो. सत्कर्माचा मोती व्हावयाचा असेल, तर ते अहंकार आणि आसक्ती यांना चिकटता कामा नये.





















