हिंदु देवतांचा अपमान करणार्‍या ‘लक्ष्मी बाँब’ चित्रपटावर बंदी घाला !

‘लक्ष्मी बाँब’ हा चित्रपट प्रदर्शित करणे हे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारा प्रकार असून तो कदापि सहन केला जाणार नाही, अशी चेतावणी राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

उत्तरप्रदेशातील लक्ष्मणपुरी आणि हमीरपूर येथे दोन साधूंची हत्या

अन्य राज्यांच्या तुलनेत उत्तरप्रदेशमध्ये हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदु संत यांच्या हत्या होण्याच्या घटना अधिक घडत आहेत. भाजपच्या राज्यात तरी हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या रोखल्या जातील आणि आक्रमणकर्त्यांवर कडक कारवाई होईल, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

बांगलादेशात श्री दुर्गापूजा प्रारंभ होण्यापूर्वी धर्मांधांकडून २ ठिकाणी देवीच्या मूर्तींची तोडफोड !

नवरात्रीला प्रारंभ होण्यापूर्वी बांगलादेशातील फरीदपूर येथील बोअलमारी आणि नारायणगंजमधील अरैहजार येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी महंमद नयन शेख (वय १८ वर्षे) आणि महंमद राजू मृधा (वय २५ वर्षे) यांना अटक केली.

चारधाम आणि ५१ मंदिरांच्या सरकारीकरणाला डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांचे आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान

डॉ. स्वामी यांच्या व्यतिरिक्त ‘पीपल्स फॉर धर्म’ आणि ‘इंडिक कॉलेक्टिव ट्रस्ट’ या दोन संघटनांनीही या सरकारीकरणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.

‘ट्विटर’वर आक्षेपार्ह चित्र प्रसारित करून अधिवक्त्या दीपिका राजावत यांचा हिंदूंना बलात्कारी दाखवण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न

देवीच्या उपासकांना बलात्कारी दाखवणार्‍या अधिवक्त्या दीपिका राजावत यांचा यातून पराकोटीचा हिंदुद्वेष दिसून येतो. देशात धर्मांधांकडून राजरोसपणे बलात्काराच्या घटना घडत असतांना ते सत्य मांडण्याचे धारिष्ट्य अधिवक्त्या राजावत यांच्यामध्ये आहे का ?

अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या प्रचारात डेमोक्रॅटिक पक्षाकडून श्री दुर्गादेवीचे विडंबन

हिंदूंच्या देवतांचा निवडणुकीच्या प्रसारासाठी विडंबनात्मक वापर करण्याच्या कृत्याचा भारत सरकारने निषेध करत ते हटवण्याची मागणी केली पाहिजे ! जगात कुठेही हिंदु देवता, धर्म आदींचा अवमान होत असेल, तर भारत सरकारने त्यास विरोध करावा !

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली शस्त्र नसलेल्या श्री दुर्गादेवीच्या मूर्तींची पूजा !

हिंदूंच्या बहुतेक देवतांच्या हातात शस्त्रे असतात, ते शस्त्रधारी असतात, असे असतांना त्यांच्या हातात शस्त्रे न दाखवणे, हा एक मोठ्या षड्यंत्राचाच भाग आहे, हे हिंदूंनी लक्षात घेऊन अशा मूर्तीशास्त्रविरोधी मूर्तींना वैध मार्गाने विरोध केला पाहिजे !  

मेरठ येथे विवाहित हिंदु महिलेची तिच्या मुलीसह हत्या करून त्यांना घरात पुरणार्‍या शमशाद याला अटक

अशांना फाशीची शिक्षा होण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !
लव्ह जिहादच्या अशा घटनांविषयी एकही पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

मंंदिर सरकारीकरण : देवनिधीची लूट करणारी हिंदुद्वेषी व्यवस्था !

सरकारीकरण केलेल्या मंदिरांची लूट रोखण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यात देणे किती आवश्यक आहे, हेच यावरून दिसून येते. हिंदु जनजागृती समितीसह अन्य विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात विविध स्तरांवर अभियानही राबवत आहेत. हिंदु राष्ट्रात सर्व मंदिरांचा कारभार भक्तांकडे असेल !

काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंदिरांचे सोने घेण्याच्या मागणीस धर्माभिमानी हिंदूंचा ट्विटरवरून विरोध

त्यांच्या विरोधात धर्माभिमानी हिंदूंनी ट्विटरच्या माध्यमांतून प्रतिक्रिया व्यक्त केल्या. धर्माभिमानी हिंदूंनी   #CongressEyesTemplesGold हा हॅशटॅग बनवून त्याद्वारे विरोध चालू केला आहे. हा ट्रेंड राष्ट्रीय ट्रेंडमध्ये ८ व्या स्थानावर होता आणि त्यावर ३५ सहस्रांहून अधिक ट्वीट करण्यात आले. यात अनेकांनी काँग्रेसवर टीका केली.