
पुणे – बांगलादेशी महिला पर्यटन (व्हिसावर) पारपत्रावर भारतात आली होती. महिलेच्या पारपत्राची मुदत ७ मार्च २०२२ या दिवशी संपली. आरोपी महंमद राणा महंमद सलाम शेख याने महिलेला बांगलादेशात परत न पाठवता तिच्याशी विवाह केला. (धर्मांध कायद्याचे वारंवार उल्लंघन करतात; कारण त्यांना कायद्याचे भय नाही. अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. – संपादक) या प्रकरणी माहिती मिळाल्यानंतर चिखली पोलिसांनी आरोपी महंमद राणा महंमद सलाम शेख, त्याची पत्नी आणि १ वर्षाचा मुलगा यांच्यावर गुन्हा नोंद करून अटक केली आहे.