राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून शिवसेना बाहेर !

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या संघर्षात भाजपशी मतभेद झाल्याने शिवसेना आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (‘एन्डीए’तून) बाहेर पडली आहे. संसदेतील दोन्ही सभागृहांत म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभा येथे शिवसेनेचे खासदार विरोधी पक्षांच्या बाकावर बसणार आहेत

सरकार स्थापण्यास वेळ लागेल ! – शरद पवार

दोन दिवसांत सरकार स्थापन करणे अवघड आहे. त्यासाठी भरपूर वेळ लागेल, घाईने काही सांगता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी १५ नोव्हेंबरला मांडली.

सरकार स्थापन करायला कोणतीही अडचण येणार नाही !  – संजय राऊत, खासदार, शिवसेना

नव्या सरकारच्या ‘फॉर्म्युल्या’ची चिंता करू नका. त्यासाठी उद्धव ठाकरे सक्षम आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार येणार आहे. लाख प्रयत्न करा, कुणीही शिवसेनेला रोखू शकणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या नेत्यांची चर्चा चालू आहे. लवकरच त्याला अंतिम रूप दिले जाणार आहे.

अमित शहा यांनी युतीच्या सत्तावाटपाची चर्चा मोदी यांच्यापासून लपवली ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

‘शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार’, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रत्येक सभेत सांगत असतांना अमित शहा गप्प का होते ?

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू !

भाजप, तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना राज्यपालानी सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित करूनही ते सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरल्याने १२ नोव्हेंबरला सायंकाळी ५.३० वाजल्यापासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात तिसर्‍यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आहे.

राष्ट्रपती राजवटीमध्ये बहुमत सिद्ध झाल्यास सत्ता स्थापन करता येते ! – उल्हास बापट, घटनातज्ञ

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास अमुक काळाच्या आतच शासन स्थापन करायला हवे, असा राज्यघटनेत कुठेही उल्लेख नाही. हा निर्णय राज्यपाल सद्सद्विवेकबुद्धीने घेऊ शकतात. राष्ट्रपती राजवट असतांनाही बहुमत सिद्ध झाले, तर सत्ता स्थापन करता येते, असे वक्तव्य घटनातज्ञ उल्हास बापट यांनी एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीच्या वेळी केले.

राष्ट्रपती राजवट लागू केल्याने होणारे पालट

१. राज्यात कलम ३५६ नुसार जर राज्य सरकारचा कारभार हा राज्यघटनेनुसार चालत नसेल, तर असा अहवाल राज्यपाल राष्ट्रपतींना देतात किंवा राष्ट्रपती सुमोटो (स्वतःच नोंद घेऊन) पद्धतीने कारभार व्यवस्थित चालत नसल्याची निश्‍चिती झाल्यावर ते जाहीरनामा काढून राष्ट्रपती राजवटीची घोषणा करू शकतात. राष्ट्रपती राजवट संपवण्याची घोषणाही राष्ट्रपतींकडूनच होते.

राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्यामुळे शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी वेळ वाढवून न दिल्याविषयी शिवसेनेने १२ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.  शिवसेनेच्या याचिकेवर न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ आज (१३ नोव्हेंबरला) सुनावणी करणार आहे.

लवकरच भाजप सत्ता स्थापन करेल ! – नारायण राणे

सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक आहे, ते मी करीन. त्यासाठी भाजपला सर्वतोपरी मी साहाय्य करीन.

राजकीय स्थितीवर भाजप लक्ष ठेवून आहे ! – सुधीर मुनगंटीवार

सध्याच्या राजकीय स्थितीवर भाजप लक्ष ठेवून आहे, असे भाजपच्या कोअर कमिटीत ठरल्याचे भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले….