कृतज्ञता व्यक्त करणे आणि अंतरीची सुरक्षा यांसाठी श्राद्धकर्म करणे आवश्यक !
तुम्ही जसे द्याल, तसे तुम्हाला मिळेल ! आई-वडिलांनी आणि महापुरुषांनी आपल्या उत्थानासाठी नाना प्रकार केले. त्यांनी तुमच्यासाठी पुष्कळ काही केले आहे. तुम्ही सुद्धा त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करा. कृतज्ञतेला स्थूल रूपात दाखवण्याचे जे दिवस आहेत, ते ‘श्राद्धाचे दिवस’ म्हटले जातात.