(म्हणे) ‘स्टेन स्वामी यांना गोवण्यासाठी संगणकात पुरावे पेरण्यात आले !’

भारतात नक्षलवादी कारवाया करणार्‍यांना आंतरराष्ट्रीय पाठबळ आहे, हे पुन्हा एका अमेरिकी संस्थेच्या दाव्यामुळे सिद्ध झाले !

गौतम नवलखा यांना घरात नजरकैदेत ठेवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश !

आरोग्याच्या कारणास्तव कारागृहाऐवजी नवी मुंबईतील घरात नजरकैदेत ठेवण्याची नवलखा यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी केली होती.

गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला !

कोरेगाव भीमा आणि एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्.आय.ए.) न्यायालयाने ५ सप्टेंबर या दिवशी फेटाळला आहे.

कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी ज्योती जगताप हिने माओवाद्यांकडून स्फोटके बनवण्याचे घेतले प्रशिक्षण ! – एन्.आय.ए.

आरोपी ज्योती जगताप हिने स्वतःवरील आरोप खोटे असल्याचा दावा करत जामिनासाठी येथील उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती; परंतु ‘एन्.आय.ए.’ने याचिकेला विरोध केला.

शहरी नक्षलवाद्यांच्या निधीचे अंमलबजावणी संचालनालयाकडून अन्वेषण होणार !

कोरेगाव भीमा दंगल आणि एल्गार परिषदेतील प्रक्षोभक वक्तव्य यांप्रकरणी अटकेत असलेले अधिवक्ता सुरेंद्र गडलिंग यांच्या आर्थिक व्यवहारांचे अन्वेषण करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने मागितलेली अनुमती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच खरी जातीयवादी आहे, हे समोर आले ! – नितीन शिंदे

‘‘प्रखर हिंदुत्वनिष्ठ अशा संघटनेच्या प्रमुखांना संपवण्याचे षड्यंत्र कसे रचले जाते, याचे हे चांगले उदाहरण आहे. या प्रकरणी पू. गुरुजी यांच्यावर खोटे आरोप करणारे शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी गुरुजींची पाय धरून क्षमा मागणे आवश्यक आहे.’’

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी शरद पवार यांची जे.एन्. पटेल आयोगाकडे साक्ष नोंद !

कोरेगाव भीमा येथील दंगलीच्या प्रकरणी पू. भिडेगुरुजी यांचे शरद पवार यांनी नाव घेतले; मात्र नंतर घूमजाव करून त्यांचा सहभाग नसल्याचे सांगितले. शरद पवार यांनी कोणत्या आधारावर त्यांचे नाव घेतले ?

शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांनी क्षमा मागावी ! – नितीन चौगुले, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान

खर्‍या सूत्रधारांवर कारवाई होण्यासाठी आम्ही राज्यभर मोर्चे काढणार आहोत, अशी माहिती श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मद्रास उच्च न्यायालयाचा निवाडा : बाँबस्फोट प्रकरणातील नक्षली आरोपीला जामीन !

बाँबस्फोटासारखा गंभीर आरोप असतांना आरोपीला जामीन मिळणे, हे पोलिसांना लज्जास्पद !

कोरेगाव भीमा घटनेत माझा कोणत्याही पक्षावर आरोप नाही ! – शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष

कोरेगाव भीमा येथे एकामागोमाग एक घडलेल्या घटनेविषयी मला वैयक्तिक कोणतेही ज्ञान अथवा माहिती नाही. या घटनेमागे कोणत्याही पक्षाचा ‘अजेंडा’ किंवा उद्देश याविषयी माझे आरोप नसल्याचे स्पष्टीकरण देत स्वत:च्या भूमिकेवरून घुमजाव केले.