काश्मीरमध्ये चकमकीत ४ आतंकवादी ठार

येथील मनगोरी परिसरात ४ एप्रिल या दिवशी भारतीय सैन्य आणि आतंकवादी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत सैन्याने ४ आतंकवाद्यांना ठार केले.

(म्हणे) ‘कोरोनाच्या प्रादुर्भावाचा दोष मुसलमानांना नको !’ – ओमर अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री, जम्मू-काश्मीर

देहलीतील तबलीगी जमातच्या प्रकरणानंतर आता काही लोक जणू काय मुसलमानांनीच जगभरात कोरोना विषाणू पसरवला आहे, असे भासवत आहेत. त्यामुळे आता काहींना मुसलमानांना शिव्या देण्यासाठी ‘तबलीगी जमात’ हा सर्वांत सोपा मार्ग उपलब्ध झाला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये २ आतंकवाद्यांना अटक

जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यामध्ये सुरक्षादलांनी २८ मार्च या दिवशी शौकत मीर आणि शौकत यत्तू या २ आतंकवाद्यांना अटक केली.

काश्मीरमध्ये ६ आतंकवाद्यांना अटक

लष्कर ए-तोयबा या जिहादी आतंकवादी संघटनेने  पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.च्या साहाय्याने ‘द रजिस्टेंस फ्रंट जम्मू-कश्मीर’ नावाची नवी जिहादी आतंकवादी संघटना बनवली आहे. या संघटनेच्या ६ आतंकवाद्यांना पोलिसांंनी अटक करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे.

२ आतंकवाद्यांसह राष्ट्रपतीपदक विजेत्या पोलीस उपअधीक्षकाला अटक

येथील कुलगाम येथून हिजबूल मुजाहिदीन या आतंकवादी संघटनेच्या २ आतंकवाद्यांसह जम्मू-काश्मीर पोलीसदलाचे राष्ट्रपतीपदक विजेते पोलीस उपअधीक्षक देविंदर सिंह यांना अटक करण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्याच्या गोळीबारात ३ आतंकवादी ठार

भारतीय सैन्याने १२ जानेवारीला सकाळी पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये लपून बसलेल्या ३ आतंकवाद्यांना ठार केले आहे. या कारवाईनंतर सैन्याने पुन्हा एकदा त्राल परिसरात शोधमोहीम चालू केली आहे.