कोरोनामुळे चीनमधून परतलेल्या २० सहस्र भारतीय विद्यार्थ्यांना पुन्हा व्हिसा देण्यास चीनचा नकार !

चीनच्या अशा डावपेचांना भारत कसे उत्तर देणार ? भारताने चीनच्या आस्थापनांवर बंदी घालणे, हाच यावरील सर्वांत परिणामकारक उपाय आहे !

राजधानी देहलीत पुन्हा ‘मास्क’ची सक्ती !

राजधानीत कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. त्यावर आळा घालण्यासाठी केजरीवाल सरकारने पुन्हा मुखपट्टी वापरणे (मास्क वापरणे) सक्तीचे केले आहे.

मिरज-परळी वैद्यनाथ-मिरज रेल्वे चालू करावी !

मागील ३ वर्षांपासून बंद असलेली ‘मिरज-परळी वैद्यनाथ-मिरज रेल्वे चालू करावी’, या मागणीचे निवेदन ‘हुतात्मा अशोक कामटे’ या बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने मध्य रेल्वे विभाग, सोलापूर यांना देण्यात आले.

वर्धक मात्रा (बूस्टर डोस) घेऊनही कोरोना होणे, हे आधुनिक वैद्यकीय विज्ञानाचे अपयश ! – योगऋषी रामदेवबाबा

वर्धक मात्रा (बूस्टर डोस) घेऊनही जर कोरोनाचा संसर्ग होत असेल, तर हे आधुनिक वैद्यकीय विज्ञानाचे अपयश आहे, असे विधान योगऋषी रामदेवबाबा यांनी येथे केले. ते एका आंतरराष्ट्रीय संमेलनात बोलत होते.

चीनमधील वुहानच्या मासळी बाजारातूनच कोरोनाचा प्रसार !

‘सायन्स’ या प्रसिद्ध नियतकालिकात प्रकाशित संशोधनांत दावा

कर्ज फेडणार्‍या शेतकर्‍यांना राज्यशासन ५० सहस्र रुपये प्रोत्साहन निधी देणार !

राज्यातील १३ लाख ८५ सहस्र शेतकर्‍यांना याचा लाभ मिळणार आहे. यासाठी ५ सहस्र ७२२ कोटी रुपये इतका निधी व्यय करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.

अमेरिकेमध्ये डॉक्टरांच्या तुटवड्यामुळे नवे संकट !

वर्ष २०३३ पर्यंत अमेरिकेत ५४ सहस्र १०० ते १ लाख ३९ सहस्र डॉक्टरांचा तुटवडा भासू शकेल. हा तुटवडा प्राथमिक, तसेच गंभीर उपचार पद्धतींच्या विभागातही भासवू लागला आहे.

इंधन समायोजन आकाराच्या नावाखाली थेट वीज आकाराच्या २० टक्के दरवाढ लागू ! – प्रताप होगाडे, वीजतज्ञ

राज्यातील घरगुती, व्यापारी, शेतकरी, औद्योगिक आणि अन्य सर्व २ कोटी ८७ लाख ग्राहकांवर जुलै २०२२ मध्ये मिळालेल्या देयकापासून ५ मासांसाठी ‘इंधन समायोजन आकार’ या नावाखाली थेट वीज आकाराच्या २० टक्के दरवाढ लागू करण्यात आली आहे.

मानसिक आरोग्य महत्त्वाचे !

एका अभ्यासानुसार कोरोना महामारीनंतर नैराश्य आणि चिंताग्रस्त लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीला लोक कसे सामोरे जात आहेत ? याचे सर्वेक्षण करण्यात आले.

वर्धक मात्रा घेण्यासाठी तब्बल ५ कोटी नागरिकांची नापसंती !

१८ वर्षांवरील सर्वांना लसीची वर्धक मात्रा विनामूल्य देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असला, तरीही मुंबई, ठाणे आणि पुणे या जिल्ह्यांत वर्धक मात्रा लसीकरणाकडे पाठ फिरवलेल्या नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे.