हिवाळ्यातील ऋतूचर्या

‘हिवाळ्यातील थंडीमुळे त्वचेवरील छिद्रे बंद होत असल्याने शरिरातील अग्नी आतल्या आत कोंडला जाऊन जठराग्नी प्रदीप्त होतो. शरिरातील रोगप्रतिकारक क्षमता आणि बळ अग्नीवर अवलंबून असल्याने तीसुद्धा या ऋतूत चांगली असतात; म्हणून हिवाळ्याचे अनुमाने ४ मास (महिने) निसर्गतःच आरोग्य उत्तम राहते.

गुरु किंवा शुक्र ग्रह अस्तंगत असतांना कोणती कार्ये करावीत आणि कोणती करू नयेत !

‘१७.१२.२०१९ पासून ७.१.२०२० पर्यंत गुरु ग्रहाचा अस्त आहे. प्रतिवर्षी सूर्य सान्निध्यामुळे मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनि हे ग्रह अस्तंगत होत असतात. त्यामध्ये धर्मशास्त्र, मुहूर्त शास्त्रकारांनी गुरु आणि शुक्र यांच्या अस्तंगत कालावधीस विशेष महत्त्व दिले आहे.