खरे ‘जागरण’ !

दैनिक ‘जागरण’ या हिंदी वृत्तपत्राने वस्तूनिष्ठ विश्‍लेषण करण्याचा प्रयत्न केला. हे अत्यंत कौतुकास्पद आहे. ‘कुंभमेळ्यामुळे देशात कोरोनाचा संसर्ग वाढला नाही’, हे ‘जागरण’ने समप्रमाण दाखवून दिले आहे. ‘जागरण’ने खरी शोधपत्रकारिता करत कुंभमेळ्यावर बोट दाखवणार्‍यांना उघडे पाडले आहे.

‘द वीक’ला ‘कीक’ !

क्रांतीकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक लेख प्रसिद्ध केल्याप्रकरणी ‘द वीक’ या इंग्रजी साप्ताहिकाने नुकतीच जाहीर लेखी क्षमायाचना केली आहे. ‘द वीक’च्या साप्ताहिकामध्ये ‘लॅम्ब लायनाइस्ड’ या मथळ्याखाली हा लेख प्रसिद्ध केला होता.

सोयीस्कर खापर !

फ्रान्सच्या शार्ली हेब्दो या प्रसिद्ध नियतकालिकाने आता हिंदूंच्या देवतांना भारतातील कोरोना रुग्णांच्या ऑक्सिजनअभावी होणार्‍या मृत्यूंसाठी उत्तरदायी ठरवण्याचा हास्यास्पद प्रकार केला आहे. या नियतकालिकाने एका चित्रात अनेक भारतीय भूमीवर झोपले असून ते ऑक्सिजनसाठी तडफडत ….

लसीकरणाचे सुनियोजन हवे !

गेल्या दीड वर्षापासून भारताला भेडसावणारी भीषण समस्या म्हणजे कोरोना ! कोरोनाच्या २ लाटांचा सामना करता करता भारताने जीवित आणि वित्त हानीही अनुभवली. कोरोनाचे थैमान काही थांबायचे नाव घेत नाही आणि त्याला प्रतिबंधात्मक अशा उपाययोजनाही अपुर्‍याच पडत आहेत.

पुन्हा इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष !

पॅलेस्टाईनच्या ‘हमास’ या आतंकवादी संघटनेने इस्रायलच्या काही शहरांवर १ सहस्र ४०० रॉकेटचा मारा केला. असे आक्रमण म्हणजे देशाच्या अस्तित्वावर आक्रमण, असे इस्रायल मानतो. त्यामुळे इस्रायलने पूर्ण त्वेषाने हमासला प्रत्युत्तर देत हवाई आक्रमण केले.

मृतदेह आणि माणुसकी !

उत्तरप्रदेश आणि बिहार येथे गंगानदीमध्ये २-३ दिवसांत अनेक मृतदेह सापडत आहेत. बक्सर (बिहार) येथे ४० मृतदेह वाहून आले आहेत. यापूर्वी उत्तरप्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातील नदीच्या किनारी अशाच प्रकारे मृतदेह वाहून आले होते. पूर्वी हमीरपूर आणि कानपूर जिल्ह्यांतही गंगानदी किनारी मृतदेह सापडले होते.

छद्म अंनिसच्या अंधश्रद्धा !

भारतीय संस्कृती परिपूर्ण विकसित आणि विश्वव्यापी होती. हिंदुद्वेषाची झापडे ओढलेल्या अंधश्रद्धाळू अंनिसला हे काय कळणार ?

तिसरे महायुद्ध !

तिसरे महायुद्ध होणार आहे, हे आतापर्यंत जगातील बहुतेक लोकांना ठाऊक झाले आहे. ते कधी चालू होणार ? हे आता पहायचे आहे, असेच चित्र आहे; मात्र ते केव्हाच चालू झाले आहे आणि त्यात आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे, तसेच अब्जावधी रुपयांची हानी होऊन जगात आर्थिक मंदी …

डी.आर्.डी.ओ.चा बोलबाला !

देशात आपत्काळ आल्यावर केवळ स्वतःचे क्षेत्र किंवा काम यांपुरता मर्यादित विचार न करता व्यापक विचार करून कृती कशी करायची ? याचा पायंडा ‘डी.आर्.डी.ओ.’ने घालून दिला आहे.

समाजद्रोह्यांची काळीकृत्ये !

कोरोनाकाळात्त मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणार्‍यांची विकृत मानसिकता प्रतिदिन समोर येत आहे. ‘कर्नाटक राज्य प्रशासन बेंगळुरू शहरातील कोणत्याही रुग्णालयात रुग्णाला खाट उपलब्ध करून देण्यासाठी लाच घेत आहे’, असा गंभीर आरोप भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी केला