कर्नाटकमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणार्‍या स्वजातीतील पुजार्‍याशी विवाह करणार्‍या ब्राह्मण वधूला मिळणार ३ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य

कर्नाटकातील भाजप सरकारचा अभिनंदनीय निर्णय !

‘आता सरकारने धर्मनिरपेक्षता जपण्यासाठी इमाम आणि मौलवी यांच्याशी विवाह करणार्‍या मुसलमान महिलांनाही अशा प्रकारचे साहाय्य द्यावे’, अशी मागणी तथाकथित निधर्मीवादी राजकीय पक्षांनी आणि संघटनांनी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक राज्य ब्राह्मण विकास मंडळाने ब्राह्मण समाजातील मुलींसाठी ‘अरुंधती’ आणि ‘मैत्रेयी’ या नावाने २ योजना चालू केल्या आहेत. या अंतर्गत  ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना आर्थिक साहाय्य मिळणार आहे.

‘अरुंधती’ योजनेच्या अंतर्गत वधूंना २५ सहस्र रुपयांचे आर्थिक साहाय्य दिले जाईल, तर ‘मैत्रेयी’ अंतर्गत कर्नाटकातील पुजार्‍यासमवेत विवाह करणार्‍या ब्राह्मण मुलीला ३ लाख रुपयांचा बाँड मिळेल. ‘अरुंधती’अंतर्गत या आर्थिक दुर्बल घटकात मोडतात अशा विवाहाचे वय झालेल्या ५५० ब्राह्मण मुलींची ओळख पटवण्यात आली आहे. ‘मैत्रेयी’ योजनेसाठी २५ मुलींची निवड करण्यात आली आहे.

१. या योजनांचा लाभ घेण्यासाठी मुलगी आणि मुलगा यांचा हा पहिला विवाह असला पाहिजे. वधूच्या कुटुंबाला ती आर्थिक दुर्बल घटकातील असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

२. कर्नाटक राज्य ब्राह्मण विकास मंडळाचे अध्यक्ष सचिदानंद यांनी म्हटलले की, आम्ही आर्थिक स्वरूपात मागास असणार्‍या गरिबांचे कल्याण करू इच्छितो विशेषतः पुजार्‍यांचे. कामाची अनिश्‍चितता यांमुळे त्यांचे जीवन खडतर झाले आहे. या योजनेच्या अंतर्गत मिळणार्‍या पैशांतून ते व्यापार करू शकतात.