गोव्यात शिक्षण खात्याच्या नियोजनाप्रमाणेच नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ शिक्षण खात्याने यापूर्वी घोषित केलेल्या नियोजनानुसार होणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्रीपद सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २० मार्च या दिवशी दिली.

२३ वर्षांच्या अथक प्रयत्नांमुळे धूलिवंदनासह रंगपंचमीच्या धर्मशास्त्राविषयी हिंदूंमध्ये जागृती !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी राबवण्यात येणार्‍या ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’ची १९ मार्चला यशस्वी सांगता झाली.

सातारा येथील लाच प्रकरणातील न्यायाधीशाला जामीन नाकारला !

लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा नोंद झालेल्या सातारा जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय निकम यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने नाकारला आहे.

हिंजवडी (पुणे) येथे ट्रॅव्हलरला लागलेल्या आगीत ४ कर्मचार्‍यांचा मृत्यू !

‘हिंजवडी फेज वन’मध्ये व्योमा ग्राफिक्स आस्थापनाच्या १४ कर्मचार्‍यांना घेऊन जाणार्‍या टेंपो ट्रॅव्हलरला १९ मार्चला अचानक आग लागली.

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांसाठी वाढीव निधी नाही ! – मंत्री मकरंद जाधव

शासन निर्णयानुसार १ लाख रुपये एवढे साहाय्य देण्यात येते. वाढीव साहाय्य देण्याविषयी प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन नाही,

हानीग्रस्त द्राक्ष उत्पादकांना भरपाई ! – कृषीमंत्री दादा भुसे

निधी वितरणासाठी महसूल विभागाची कार्यवाही चालू आहे, त्यांना भरपाई मिळेल, अशी माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी विधानसेभत दिली.

अरेरावी करणार्‍या रिक्शा-टॅक्सी चालकांच्या विरोधात ‘व्हॉट्सॲप’ क्रमांक कार्यान्वित होणार ! – परिवहनमंत्री

येणार्‍या तक्रारींशी संबंधित रिक्शा अथवा टॅक्सी चालकाला परिवहन विभागाने नोटीस पाठवावी. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यकता भासल्यास त्याची अनुज्ञप्ती (परवाना) रहित करण्याची कारवाई करावी, असे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले आहेत.

शाळांसह मैदानावरही सीसीटीव्ही आवश्यक ! – चित्रा वाघ, आमदार, भाजप

विद्यार्थी-विद्यार्थिनींची सुरक्षा धोक्यात आल्यामुळे सीसीटीव्ही लावावे लागणे हे मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीचे फलीत !

भारत जगातील पहिल्या ३ क्रमांकावर पोचेल एवढी क्षमता वाढवण बंदरात !

पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या विकासामध्ये महाराष्ट्र राज्यशासनाचा २६ टक्के वाटा आहे. उर्वरित वाटा हा केंद्रशासनाचा आहे. या बंदराची नैसर्गिक खोली २० मीटर आहे. इतकी खोली आपल्या देशात अन्य कोणत्याही बंदराची नाही.

नागपूरच्या दंगलग्रस्त भागाच्या पहाणीसाठी काँग्रेसची समिती गठीत

अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्याची एकही संधी न सोडणारा काँग्रेस पक्ष !