त्र्यंबकेश्वर देवस्थानाला वर्ग ‘अ’ दर्जा घोषित !

नगरविकास विभागाची मान्यता !

श्री त्र्यंबकेश्वर मंदिर, नाशिक

नाशिक – आगामी काळात होणार्‍या कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर देवस्थानाला वर्ग ‘अ’ दर्जा घोषित करण्यात आला आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने या निर्णयाला मान्यता दिली. विभागीय आयुक्तांकडून याविषयीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. यामुळे येथील देवस्थानाच्या विकास आराखड्याला गती मिळणार असून भाविकांनाही सोयीसुविधा उपलब्ध होतील.