संभाजीनगर येथे महिला पोलिसाशी गैरवर्तन केल्याप्रकरणी एम्.आय.एम्. पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह २५ जणांविरुद्ध गुन्हे नोंद !

येथील एम्.आय.एम्. पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी शहरातील दुकानांवरील कारवाई मागे घेण्यासाठी कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ यांच्याशी उद्धट वर्तन करून अरेरावी केली, तसेच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसमोर महिला पोलिसाशी गैरवर्तन केले.

राज्यात कोरोनामुळे पालक गमावलेली १९५ बालके झाली अनाथ ! – यशोमती ठाकूर, महिला आणि बालकल्याणमंत्री

‘राज्यात कोरोनामुळे पालक गमावलेली अनुमाने १९५ बालके अनाथ झाली आहेत. यामध्ये आई-वडील गमावलेल्या मुलांची संख्या १०८, तर एकच पालक गमावलेली मुले ८७ आहेत.

पुणे येथील अवैध दारुभट्टीवर धाड टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर महिलांची दगडफेक

भरदिवसा गुन्हेगार पोलिसांवर आक्रमण करतात, यावरून गुन्हेगारांना पोलिसांचा किंवा कायद्याचा धाक वाटत नाही, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? स्वतःचे ही रक्षण करू न शकणारे पोलीस जनतेचे रक्षण कसे करणार ?

नांदेड येथे महिला पोलीस कर्मचार्‍याच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोराने पळवले !

महाराष्ट्रात महिला पोलीसही असुरक्षित !

अमरावती येथे मद्याच्या नशेत असलेल्या महिला कर्मचार्‍याने पोलिसांशी घातली हुज्जत !

महिला कर्मचार्‍याने दारू पिणे आणि त्या नशेत अयोग्य कृती करणे हे नैतिकतेचे अधःपतन झाल्याचे उदाहरण !

महिला दिवसातून सरासरी ६२ वेळा, तर पुरुष केवळ ८ वेळाच हसतात ! – सर्वेक्षण

हसण्यामुळे रक्तदाबाचा त्रास न्यून होतो. जेव्हा व्यक्ती हसते, तेव्हा २२ स्नायू काम करतात. त्यामुळे हसण्याने शरिराची ऊर्जाही वाचते.

पुणे येथील कष्टकरी महिलांचे जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन !

देहविक्रय करणार्‍या महिलांच्या साहाय्य योजनेतील फसवणुकीने जमा केलेले पैसे परत घ्या आणि ज्याचे त्याला द्या. हे कारस्थान करणार्‍यांचा तपास करून त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी करीत कष्टकरी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले.

अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीतील कर्मचार्‍याने मागितलेली लाच देण्यासाठी महिलेने काढले कर्ज !

मृताच्या टाळूवरील लोणी खाणार्‍या अशा कर्मचार्‍यांना फाशीची शिक्षा करा !

हासन (कर्नाटक) येथे रेव्ह पार्टीवर घातलेल्या धाडीत महिला पोलीस शिपायाला अटक !

ज्यांनी कायद्याचे रक्षण करावे, तेच कायद्याचे उल्लंघन करत असतील, तर कायदा आणि सुव्यवस्था कशी राहील? अशांना बडतर्फ करून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !

पुणे येथे ३ वर्षांत ४ सहस्र ५०० महिलांच्या हरवण्याची नोंद !

संसारातील कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी संयम आणि तडजोड करण्याची वृत्ती असणे आवश्यक आहे. असे का वागायचे असते, याचे शास्त्र समजले की, कृती करणे सोपे जाते. यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे.