भारतासह जगातील ५३ देशांतील १.५ कोटी लोकांनी पाहिले प्रथम राजयोगी स्नान !

कुंभमेळ्यातील विविध आखाड्यांतील संत-महंत यांनी केलेल्या प्रथम राजयोगी स्नानाचे थेट प्रक्षेपण भारतासह जगातील ५३ देशांतील दीड कोटी लोकांनी पाहिले. १५ जानेवारीला सकाळी ६.३० वाजता राजयोगी स्नानाचे थेट प्रक्षेपण चालू करण्यात आले होते.

सनातनचे ‘हिंदु राष्ट्र स्थापने’चे कार्य देशाला सुधारत आहे ! – महामंडलेश्‍वर श्री महंत श्री रामेश्‍वरदास महाराज

महामंडलेश्‍वर श्री रामेश्‍वरदास महाराज आणि त्यांच्या समवेत आलेले जम्मू येथील गोरक्षा दलाचे कार्य करणारे श्री. राजा भैय्या यांनी कुंभनगरीतील सनातनच्या राष्ट्र अन् धर्मजागृतीच्या ग्रंथप्रदर्शनास भेट दिली.

सनातनचे ग्रंथ पाहून पुष्कळ चांगले वाटले ! – श्री महामंडलेश्‍वर श्री श्री १००८ महंत गोपालदास महाराज

जम्मू-काश्मीरच्या कठुआ येथील आश्रमाचे श्री महामंडलेश्‍वर श्री श्री १००८ महंत गोपालदास महाराज यांनी १६ जानेवारीला कुंभमेळ्यातील सनातनच्या ग्रंथ आणि फ्लेक्स प्रदर्शनास भेट दिली.

सनातनचे ग्रंथ आणि फ्लेक्स यांचे प्रदर्शन पाहून भारावून गेलेल्या धर्मप्रेमीने टप्प्याटप्प्याने १०० महिलांना प्रदर्शन दाखवण्याचा केला निर्धार !

येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे भव्य प्रदर्शन लावण्यात आले असून या प्रदर्शनाला गुजरातमधील धर्मप्रेमी श्री. खेंगाडभाई डोडीया यांनी १६ जानेवारी या दिवशी भेट दिली.

कुंभमेळ्याला भेट देऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतले त्रिवेणी संगमाचे दर्शन !

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी १७ जानेवारी या दिवशी कुंभमेळ्याला भेट दिली. या वेळी गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती या नद्यांचा त्रिवेणी संगम पाहून ते भारावून गेले.

कुंभमेळ्याचे जिवंत शब्दचित्रण करणारे सदर : कुंभदर्शन

उत्तरप्रदेशमध्ये प्रयागराज येथे चालू असलेल्या महाकुंभमेळ्यात अखेर किन्नर आखाड्याचे नागा संन्यासी साधूंच्या जुना आखाड्यात विलिनीकरण झाले. त्यानंतर जुना आखाड्याच्या संत-महंतांच्या जत्थ्यासह किन्नर आखाड्यातील किन्नरांनी अमृतकुंभ स्नान केले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समयमर्यादेत राममंदिराची उभारणी करावी ! – श्री श्री १००८ बाबा गोविंददास महाराज

येथील शाही स्नान मार्ग, तसेच संगमाच्या ठिकाणी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने अयोध्या येथे राममंदिराची उभारणी होण्यासाठी ‘श्रीराम जय राम जय जय राम’ अशाप्रकारे श्रीरामाच्या नामजपाचे अभियान १५ ….

कुंभमेळ्यात भाविकांचे साहित्य चोरणार्‍या टोळीच्या प्रमुखासह १३ जणांना अटक

कुंभमेळ्यात भाविकांची लूट आणि त्यांच्या साहित्याची चोरी करणार्‍या १३ चोरांना गुन्हे अन्वेषण विभाग आणि झूंसी पोलिसांनी अटक केली आहे. गोंडा जिल्ह्यात रहाणारा टोळीचा सूत्रधार श्याम बाबू गोंडा याच्यासह इतर १२ जणांचा यामध्ये ….

कुंभमेळ्यातील जगद्गुरु स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांच्या आखाड्याला आग  

कुंभमेळ्यात आखाड्यांना आग लागण्याच्या घटनेत वाढ होत आहे. १६ जानेवारीला सायंकाळी सेक्टर १५ मधील जगद्गुरु स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांच्या आखाड्यात एके ठिकाणी आग लागली.

कुंभमेळ्याचे जिवंत शब्दचित्रण करणारे सदर : कुंभदर्शन

हिंदु धर्मातील विविधता, विशालता, सर्वसमावेशकता, एकता आणि अखंडता यांचे सर्वांगसुंदर दर्शन घडवणार्‍या जगाच्या पाठीवर एकमेव असलेल्या ‘कुंभमेळ्या’च्या निमित्ताने ‘कुंभदर्शन’ या विशेष सदरास आरंभ करण्यात आला आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now