सरकार लाडक्या बहिणींची फसवणूक करणार नाही ! – मंत्री अदिती तटकरे
राज्य सरकार बहिणींची फसवणूक करत आहे. आश्वासन दिल्याप्रमाणे सरकार २ सहस्र १०० रुपये देत नाही. या कारणावरून विरोधकांनी गदारोळ करत काही वेळेकरिता सभात्याग केला.
राज्य सरकार बहिणींची फसवणूक करत आहे. आश्वासन दिल्याप्रमाणे सरकार २ सहस्र १०० रुपये देत नाही. या कारणावरून विरोधकांनी गदारोळ करत काही वेळेकरिता सभात्याग केला.
बालकांसाठीचा घरपोच आहार मानवी हस्तक्षेप विरहीत यंत्राद्वारे करण्यात येतो. त्यासाठी १५ ते २० दिवसांचा अवधी लागतो. पाकिटामध्ये प्राण्याचे अवशेष हे ओल्या स्वरूपात असून तो १-२ दिवसामध्ये मृत झाला असावा, हा अहवाल चुकीचा असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
वेश्या व्यावसायिकांकडूनही हप्ते घेणारे पोलीस हे पोलीस दलासाठी कलंकच आहेत !
तालुक्यातील माटणे येथे मोठ्या प्रमाणात दिसलेल्या मातीच्या साठ्याची छायाचित्रे काढणार्या तालुक्यातील ३ पत्रकारांना धमकावण्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणी मातीचा साठा ज्या भूमीत करून ठेवला होता
होळीनिमित्त सार्वजनिक ठिकाणी अश्लील गाणी लावल्यास, अश्लील हावभाव केल्यास, तसेच अनोळखी व्यक्तींवर रंगांचे फुगे फेकल्यास कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी मुंबई पोलिसांनी दिली आहे.
तिलारी धरणाच्या जवळ जुने शिरंगे येथे चालू असलेल्या काळ्या दगडाच्या खाणी कायमस्वरूपी बंद कराव्यात, या मागणीसाठी खानयाळे ग्रामस्थांनी चालू केलेले साखळी उपोषण आंदोलनाच्या आठव्या दिवशी, म्हणजे १३ मार्च या दिवशी पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेतले.
विक्रोळी पार्क येथील नीलकंठेश्वर मंदिर येथे हिंदु युवक – युवतींसाठी शौर्य प्रशिक्षण शिबिर पार पडले. यामध्ये कराटे, दंडसाखळी, लाठी-काठी यांचे प्रशिक्षण देण्यात आले, तसेच वक्त्यांनी भारतीय संस्कृती आणि भारताचा गौरवशाली इतिहास यांविषयी संबोधित केले.
शासनाने ‘सर्टिफिकेट’ची आणलेली योजना चांगली असून त्याला आमचा पाठिंबा आहे; मात्र या योजनेस ‘मल्हार’ हे नाव न देता इतर नाव द्यावे.
सर्वाेच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार येत्या ६ मासांत गोवा राज्यातील खाण व्यवसाय पूर्णपणे चालू होईल, असे आश्वासन केंद्रीय खाण व्यवसाय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी दिले आहे.
नगर नियोजन कायद्यातील कलम १७ (२) मधील नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे यांनुसार करण्यात येणारी कार्यवाही उच्च न्यायालयाकडून रहित करण्यात आली आहे.