लोणी कॉर्नर ते कवडी पाट पथकर नाक्यापर्यंत वाहनांच्या ५ किलोमीटर रांगा !

पुणे शहरात अवजड वाहनांना बंदी घातल्याने कवडीपाट पथकर नाक्यापासून लोणीपर्यंत ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे या रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड वाहतूककोंडी झालेली होती.

ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. विजय केळकर यांना यंदाचा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ घोषित !

डॉ. विजय केळकर यांना अर्थशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी वर्ष २०२५ चा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ प्रदान करण्याचा निर्णय ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने घेतला आहे.

बालिकेवर अत्याचार करणार्‍याला २३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

अशा प्रकारे सर्वच अत्याचारांना कठोर शिक्षा दिल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !

११ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणार्‍या वडिलांना अटक !

उल्हासनगर येथे रहाणार्‍या ११ वर्षांच्या मुलीवर वडिलांनी अत्याचार केले. वर्गशिक्षिकेच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला. या प्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून वडिलांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

नागपूर येथे पोलिसांवर आक्रमण करणार्‍या जिहादी मानसिकतेच्या गुंडांवर कडक कारवाई करा !

सकल हिंदु समाजाचे ठिकठिकाणी निवेदन

भ्रमणभाषवर क्रिकेट सामना पहात बस चालवणार्‍याला कामावरून काढले !

क्रिकेटचा सामना पहात बस चालवणार्‍या चालकावर एस्.टी. महामंडळाने कारवाई केली आहे. या बसचालकाला कामावरून काढण्यात आले आहे. तसेच चालक पुरवणार्‍या खासगी आस्थापनाला ५ सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

हिंदूंचे सणही आज दहशतीखाली साजरे करावे लागत आहेत ! – कु. प्राची शिंत्रे, हिंदु जनजागृती समिती

तळेगाव दाभाडे (पुणे) येथील सभेस धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

क्रूरकर्मा औरंगजेबाच्या उदात्तीकरणाच्या विरोधात सभागृहात प्रश्न उपस्थित करा !

हिंदु एकता आंदोलनाकडून हिंदुत्वनिष्ठ आमदारांना प्रश्नावली सादर !

कोंढवा परिसरात चारचाकी लावण्यावरून दोघांमध्ये वाद !

ही घटना कोंढवा येथील कौसरबाग येथील सना हॉस्पिटल समोरील सार्वजनिक रस्त्यावर सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. दोघांवरही गुन्हा नोंद केला आहे.

गडचिरोलीतील मानवावरील वाघांची आक्रमणे रोखण्यासाठी ३ महिन्यांत आराखडा सिद्ध करा ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

असे निर्देश देण्याची वेळ का येते ?