भालचंद्र नेमाडे यांच्यावर गुन्हा नोंद करून ज्ञानपीठ पुरस्कार परत घ्यावा ! – मुख्यमंत्र्याना निवेदन

यवतमाळ, २४ जानेवारी (वार्ता.) – ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ या पुस्तकाचे लेखक भालचंद्र नेमाडे यांनी या पुस्तकात हिंदु धर्मासमवेत जिल्ह्यातील १२ कोटी बंजारा समाज बांधवांच्या धर्मभावना दुखावल्या आहेत. त्या समाजातील महिलांविषयी आक्षेपार्ह लिखाण केले. स्त्री ही माता, भगिनी, अर्धांगिनी आणि देवी यांच्या रूपात हिंदु धर्मीय पूजतो. त्यामुळे भालचंद्र नेमाडे यांच्यावर आणि प्रकाशकावर गुन्हा नोंद करावा, तसेच  नेमाडे यांचा ज्ञानपीठ पुरस्कार परत घ्यावा, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना जिल्हाधिकारी, यवतमाळ यांच्या वतीने देण्यात आले.

या निवेदनानुसार कारवाई न झाल्यास विविध आंदोलने करण्यात येतील आणि पुढील सर्व पर्याय वापरण्यात येतील, अशी चेतावणी यवतमाळ जिल्ह्यातील बंजारा समाजाने दिला आहे.