Rain Floods Sahara Desert : मोरोक्कोतील सहारा वाळवंटात सलग २ दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे तलाव भरले !
जगातील सर्वांत कोरडे आणि ओसाड क्षेत्र समजल्या जाणार्या आफ्रिकेच्या सहारा वाळवंटात ५० वर्षांनंतर इतका मुसळधार पाऊस पडला की, तेथील तलाव पाण्याने भरले. तज्ञांच्या मते हवामानातील पालटामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.