अवैध व्यवसायाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी हिंगोली येथील साहाय्यक पोलीस निरीक्षक रवीकांत हुंडेकर यांचे निलंबन !

अवैध व्यवसायाकडे दुर्लक्ष करणार्‍या अशा पोलीस अधिकार्‍यांना बडतर्फ करून आजन्म कारागृहात टाका !

पुणे येथील हॉटेल क्लब २४ मध्ये अवैधरित्या चालू असलेल्या हुक्का बारवर गुन्हे शाखेची कारवाई, ३५ सहस्रांचा माल जप्त !

या प्रकरणी हॉटेलचो मालक अमर लटुरे आणि हॉटेल मॅनेजर विक्रम जाधव यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मागील वर्षांच्या तुलनेत वर्ष २०२० मध्ये नक्षलवाद्यांच्या आक्रमणात नगण्य घट !

गेली ६ दशके चालू असलेला नक्षलवाद आतापर्यंत देशातून नष्ट होणे अपेक्षित असतांना त्यात प्रतिवर्षी नगण्य घट होणे आतापयर्र्ंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पदच आहे !

मिजोराम पोलिसांच्या गोळीबारात आसामचे ६ पोलीस ठार, तर ५० हून अधिक घायाळ !

देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे पूर्ण होत असतांना भारतात अजूनही राज्यांतील सीमावाद चालू असून त्यात पोलिसांचे नाहक बळी जाऊ देणे, हे भारताला लज्जास्पद ! यास आतापर्यंतचे शासनकर्ते उत्तरदायी आहेत, हे लक्षात घ्या !

बाणावली समुद्रकिनार्‍यावर २ अल्पवयीन मुलींवर पोलीस असल्याचा बहाणा करून बलात्कार : चारही संशयित पोलिसांच्या कह्यात

बलात्कार्‍यांवर कठोर कारवाई करण्यासमवेतच समाजाला धर्मशिक्षण आणि युवतींना स्वरक्षण प्रशिक्षण यांची नितांत आवश्यकता !

विशेष अन्वेषण पथक गेली ७ वर्षे करत आहे कोट्यवधी रुपयांच्या खाण घोटाळ्याचे अन्वेषण !

एवढ्या कूर्मगतीने अन्वेषण केल्यावर दोषींवर कधी कारवाई होईल का ? अन्वेषण पथक सक्षम नाही कि त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे ? जनतेने काय समजायचे ?

गडचिरोली येथे पोलिसांकडून भूमीत पुरलेली स्फोटके नष्ट !

कित्येक दशकांपासून चालू असलेला नक्षलवाद संपवू न शकणे, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांचे अपयशच !

करहर (सातारा) येथील श्री विठ्ठल मंदिराला पोलीस छावणीचे स्वरूप !

आषाढी एकादशीनिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिपंढरपूर समजल्या जाणार्‍या सातारा जिल्ह्यातील करहर येथील श्री विठ्ठल मंदिर परिसराला २० जुलै या दिवशी पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

कायदा तोडून मंदिरात प्रवेश करणार्‍या गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याऐवजी पोलिसांनी कार्यकर्त्यावर गुन्हा नोंदवला !

सर्वसामान्य नागरिकांना मंदिरात प्रवेशबंदी असतांना राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नाशिकमधील आनंदवली येथील नवश्या गणपति मंदिराच्या गाभार्‍यात जाऊन आरती केली.

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील फरार आरोपीने निवडणूक लढवली, ती जिंकली आणि गावचा सरपंचही बनला !

पोलिसांना मात्र पत्ताच नाही !
यास उत्तरदायी असलेल्या पोलिसांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !