आपत्काळात नामजपादी साधनेचे महत्त्व घरबसल्या जाणून घेण्याची सुसंधी !

आपत्काळात नामजपादी साधनेचे महत्त्व जाणून घेण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने घेण्यात येणार्‍या ‘ऑनलाईन’सत्संगात घरबसल्या अवश्य सहभागी व्हा ! या सत्संगांचा तपशील पुढीलप्रमाणे . . .

नाशिक शहराच्या सीमेजवळ पोलिसांनी ५०० हून अधिक परप्रांतियांना अडवले

मुंबई, ठाणे यांसह विविध भागांतून उत्तरभारत आणि राजस्थान येथे निघालेल्या ५०० हून अधिक परप्रांतीय कामगारांना नाशिक शहराच्या सीमेजवळ अंबड येथे पोलिसांनी अडवले आहे.

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २१६

आतापर्यंत महाराष्ट्रात एकूण २१६ कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. यामध्ये मुंबईत सर्वाधिक ७५, तर पुणे येथे ४२ कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत.

दारु उपलब्ध होत नसल्यामुळे केरळमध्ये आत्महत्येच्या घटनांत वाढ !

केवळ महसूल मिळण्यासाठी दारुविक्रीला मान्यता देऊन जनतेला मद्यपी बनवणार्‍या राजकारण्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? अशा घटना केरळमधील डाव्यांच्या सरकारला लज्जास्पद आहेत !

(म्हणे) ‘संतापात नैराश्याची भर पडू नये, यासाठी मद्यविक्री चालू ठेवा !’ – ऋषी कपूर, अभिनेते

नैराश्यावर मात करण्यासाठी मद्य नव्हे, तर साधना करणे आवश्यक आहे ! ऋषी कपूर यांच्यासारख्या काही श्रीमंत वलयांकित व्यक्तींना आपत्काळाचे भान नाही, असेच त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येते ! वलयांकित व्यक्तींनी अशी समाजविघातक विधाने करून लोकांना चिथावू नये !

भारताने कोरोनाविरुद्धचे युद्ध ६० टक्के जिंकले !

आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे बंद करून आणि संपूर्ण देशात दळणवळण बंदी करून भारताने कोरोनाविरुद्धचे युद्ध ६० टक्के जिंकले आहे.

‘टाटा सन्स’कडून अतिरिक्त १ सहस्र कोटी रुपयांचा साहाय्य घोषित

कोरोनाशी लढण्यासाठी ‘टाटा ट्रस्ट’ने ५०० कोटी रुपयांच्या साहाय्याची घोषणा २९ मार्चला केली होती. त्यानंतर काही वेळातच ‘टाटा सन्स’ने अतिरिक्त १ सहस्र कोटी रुपये साहाय्य देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ‘टाटा ग्रुप’ने एकूण १ सहस्र ५०० कोटी रुपयांचे साहाय्य केले आहे.

‘कोरोनाचा प्रसार करा !’ असे विचार पसरवणार्‍या मुजीब महंमद याला अटक

धर्मांधांची मानसिकता लक्षात घ्या आणि आतातरी आत्मघाती धर्मनिरपेक्षतेच्या गुंगीतून जागे व्हा ! देशद्रोही आणि जनताद्रोही धर्मांध अन् त्यांचे पाठीराखे यांच्यावरही पोलिसांनी कारवाई केली पाहिजे !

दळणवळण बंदी असतांना पायी गावी जाणार्‍या कामगारांनी लकवाग्रस्त वृद्धाला खांद्यावरून ५०० कि.मी. पर्यंत नेले !

कुठे ५०० किलोमीटर वृद्धांना कोणतीही साधने नसतांना घेऊन जाणारे हिंदू, तर कुठे वृद्धांना मरण्यास सोडून देणारे कोरोनाग्रस्त स्पेनसारखे अन्य देश ! हिंदु सोडून अन्य कुठल्या संस्कृतीत इतकी आपुलकी आहे का ?

गांभीर्याचा अभाव असलेल्यांना ओळखा !

‘राज्यशासनाला पैशांची पुष्कळ आवश्यकता आहे. जसे आधी मद्यपान करायचे, तसे लोक आताही करतच आहेत. त्यामुळे ढोंगीपणा करू नका. मद्यविक्री कायदेशीर करा’, असे ‘ट्वीट’ अभिनेते ऋषी कपूर यांनी केले आहे.