देशात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात होत असतांना कशाच्या आधारावर पाठ थोपटून घेत आहेत ? – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

मुंबईत कोरोनाच्या रुग्णांसाठी खाटा नाहीत, रुग्णवाहिन्यांविना रस्त्यावर मृत्यू होत आहेत. मुंबईत कोरोनाच्या चाचण्या अधिक होत असल्याचे सांगितले; मात्र चाचण्या होत नाहीत. आज संपूर्ण देशात कोरोनाबाधित रुग्ण ५ टक्के असतांना महाराष्ट्रात मेमध्ये ३५ टक्के रुग्ण आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली पत्रकार परिषद आभासी होती ! – अनिल परब, परिवहनमंत्री

देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली पत्रकार परिषद आभासी होती. महाराष्ट्र सरकारला २०१९-२० या वर्षाचे हक्काचे १८ सहस्र कोटी रुपये मिळालेले नाहीत. फडणवीसांच्या दाव्याप्रमाणे १७५० कोटी रुपयांचा गहू महाराष्ट्राला मिळालेला नाही.

पुणे जिल्ह्यात जवळपास निम्मे रुग्ण कोरोनाच्या आजारातून बरे होतात ! – डॉ. दीपक म्हैसेकर, आयुक्त, पुणे

जिल्ह्यात १८ मे या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत एकूण ४ सहस्र १२३ कोरोनाचे रुग्ण असले, तरी अ‍ॅक्टिव्ह केसेसची संख्या १ सहस्र ९०३ एवढी, म्हणजेच ४६ टक्के आहे. २ सहस्र १४ रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४९ टक्के आहे.