शिवमय वातावरणात आणि उत्‍साहात प्रतापगड येथे ‘शिवप्रतापदिन’ साजरा

श्री भवानीमातेच्‍या मंदिरासमोर ध्‍वजस्‍तंभाचे मान्‍यवरांच्‍या हस्‍ते पूजन झाले. भगव्‍या ध्‍वजाचे ध्‍वजारोहण कुंभरोशीचे सरपंच कांचन सावंत यांच्‍या हस्‍ते केले. मानाच्‍या पालखीची मान्‍यवरांच्‍या हस्‍ते पूजा करण्‍यात आली.

विनापरवाना भंगार व्‍यवसाय करणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! – मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस

चिखली, कुदळवाडी भागातील विनापरवाना भंगार दुकानचालक आणि बांगलादेशी, रोहिंग्‍या घुसखोर यांवर कठोर कारवाई करावी.

कारखाने आणि हॉटेलचालक यांनी कचरा उघड्यावर टाकल्यास कठोर कारवाई करणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

औद्योगिक कारखाने आणि हॉटेलचालक त्यांचा कचरा गावाच्या वेशीवर आणून टाकत आहेत. अशा प्रकारांत वाढ झालेली आहे आणि हे प्रकार त्वरित थांबवावे, अन्यथा सरकार संबंधितांची वीज आणि पाणी यांची जोडणी तोडणे अन् आस्थापनांना टाळे ठोकणे, अशी कठोर कारवाई करणार आहे.

पाकिस्तानात जन्मलेले शेन पेरेरा यांना ‘सी.ए.ए.’ अंतर्गत भारतीय नागरिकत्व बहाल

‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’च्या (सी.ए.ए.च्या) अधिनियमाच्या अंतर्गत पाकिस्तानात जन्मलेले गोव्यातील रहिवासी शेन सेबॅस्टियन पेरेरा आणि त्यांचे कुटुंबीय यांना भारतीय नागरिकत्व प्रदान करण्यात आले आहे.

भविष्यकाळात पर्यायी ऊर्जेकडे वळणे आवश्यक ! – सुदिन ढवळीकर, वीजमंत्री

भविष्यात औष्णिक ऊर्जेचा दीर्घकाळ वापर करणे शक्य नसल्याने इतर पर्यायी ऊर्जास्रोतांकडे वळणे आवश्यक आहे, असे वक्तव्य वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले.

यंदाचा ‘पुणे पुस्‍तक महोत्‍सव’ विश्‍वविख्‍यात होईल ! – चंद्रकांत पाटील, आमदार, भाजप

पुणे शहर लेखन, वाचन, चिंतन आणि संशोधन यांची प्रयोगशाळा आहे. पुण्‍याच्‍या श्री गणेशोत्‍सवाप्रमाणेच यंदाचा ‘पुणे पुस्‍तक महोत्‍सव’ विश्‍वविख्‍यात होईल. पुणे पुस्‍तक महोत्‍सवाचे अनुकरण राज्‍यातील सर्व शहरांना करावेसे वाटत आहे.

जत येथे हिंदुत्वनिष्ठांनी ‘अफझलखानवधा’चे फलक पुन्हा झळकावले !

हिंदुत्वनिष्ठांनी स्वतःवरील अन्यायाच्या विरोधात संघटितपणे वैध मार्गाने लढा दिल्यास त्यांना यश येते, हे यातून लक्षात येते

पेण येथे शिवप्रतापदिनानिमित्त मातृ-पितृ इच्‍छापूर्ती दिवस साजरा !

भगव्‍या ध्‍वजाचे पूजन करून श्री तुळजाभवानीच्‍या मंदिरामध्‍ये गोंधळ, शौर्यगीते, तसेच देवीची आरती म्‍हणण्‍यात आली. या वेळी अफझलखानवधाचे प्रतीक म्‍हणून अफझलखानाचे मातीचे मुंडके आई तुळजाभवानीच्‍या चरणी वहाण्‍यात आले. सर्व धारकर्‍यांनी पदयात्रेत उत्‍साहपूर्ण वातावरणात घोषणा दिल्‍या, तसेच शौर्यगीतांसह पदयात्राही पार पडली.

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात महाराष्ट्रात ठिकठिकाणी ‘सकल हिंदु समाजा’चे निषेध मोर्चे !

बांगलादेशामधील हिंदूंवर होणार्‍या अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदु समाजाच्या वतीने महाराष्ट्रात ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ‘आय.टी.एम्.एस्.’ प्रणालीद्वारे वाहनांवर लक्ष्य !

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ‘आय.टी.एम्.एस्.’ (इंटेलिजन्‍स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्‍टम) प्रणाली अंतर्गत ५२ ठिकाणी दोन्‍ही बाजूंनी कृत्रिम बुद्धीमत्तेवर (एआय) आधारित छायाचित्रक बसवण्‍यात आले आहेत.