चीनसमवेत ‘हंबनटोटा बंदर’ करार करणे, ही आमची घोडचूक ! – श्रीलंका

‘‘श्रीलंकेला स्वतःचे अलिप्तवादी धोरण सोडायचे नाही. त्याचसह ‘इंडिया फर्स्ट’ हे धोरणही आम्ही सोडणार नाही. रणनीती सुरक्षेच्या संदर्भात ‘इंडिया फर्स्ट’चेच धोरण अवलंबण्याचा आदेश राष्ट्र्रपती गोटबया राजपक्षे यांनी दिला आहे. आम्हाला भारतापासून कोणताही धोका संभवत नाही. उलट भारतापासून आम्हाला अधिक लाभ करून घ्यायचा आहे.’’

श्रीलंकेत गोहत्येवर बंदी आणणार; पण गोवंशियांचे मांस खाण्यास मात्र अनुमती कायम

भारतात एखाद्या वाघाची किंवा हरिणाची शिकार झाली, तर लगेच प्राणी संघटना, सरकार, वर्तमानपत्रे त्याची तत्परतेने नोंद घेतात; परंतु प्रतिदिन मोठ्या प्रमाणात गोहत्या होत असतांना यांपैकी कुणी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या ! जे छोट्याशा श्रीलंकेला जमते, ते भारताला का जमत नाही ?