(म्हणे) ‘श्री गणेशमूर्ती हौदात किंवा अमोनियम बायकार्बोनेटच्या मिश्रणात विसर्जित करा !’

‘पर्यावरणपूरक’तेच्या नावाखाली पुणे महापालिकेचे धर्मशास्त्रविसंगत आवाहन

स्वयंघोषित उपदेशकर्त्यांचा सुळसुळाट !

हिंदूंचे सण विशेषतः गणेशोत्सव जवळ आला की, अनेकांच्या कल्पनाशक्तीला धुमारे फुटतात. त्यातून ‘पर्यावरणपूरक’ या शब्दाच्या नावाखाली गणेशोत्सव साजरे करण्याचे आणि श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्याचे नानाविध पर्याय सुचवले जातात.

भारतात १८ वर्षांखालील मुलींची गर्भवती रहाण्याची ४४ लाख ६७ सहस्र प्रकरणे

भारतात १८ वर्षांपेक्षा अल्प वयाच्या मुलींचे गर्भवती होण्याची ४४ लाख ६७ सहस्र प्रकरणे समोर आली आहेत. यातील केवळ उत्तरप्रदेश राज्यातच ४ लाख प्रकरणे आहेत, तर ८९ टक्के प्रकरणे ग्रामीण भागातील आहेत.

तमिळनाडूत स्थापन केलेल्या ‘क्रिकेट गणेश मंदिरा’त गणेशमूर्तींना खेळाडूंच्या रूपात दाखवले !

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे देवतांचे मानवीकरण करणारे हिंदू ! सध्या ब्रिटनमध्ये विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धा चालू आहे. स्वतःला गणेशभक्त समजणारे मूर्तीकार के.आर्. रामकृष्णन् यांनी या निमित्ताने रामकृष्णन् यांनी ‘क्रिकेट गणेश मंदिर’ उभारले आहे.

संभाजीनगर येथे वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पत्नीपीडित पुरुषांकडून पिंपळाच्या झाडाची पूजा

येथे वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला ‘पत्नीपीडित संघटने’च्या वतीने पत्नीच्या त्रासाला कंटाळलेल्या पुरुषांनी एकत्र येऊन पिंपळाच्या झाडाची पूजा केली. या वेळी उपस्थित पुरुषांनी ‘सात जन्मच काय, तर सात सेकंदही ही पत्नी नको’, अशी प्रार्थना केली, तसेच ‘या पत्नीपासून आमची सुटका कर’, अशी यमदेवतेला प्रार्थना केली.

(म्हणे) ‘मुसलमान चालकाला शक्य नसल्याने मी रोजा पाळतो !’ – हिंदु वनअधिकारी

मुसलमानांनी हिंदूंसाठी कधी उपवास केल्याचे ऐकले आहे का ? अन्य पंथीय काही झाले, तरी त्यांचे धर्माचरण सोडून इतरांचे धर्माचरण करत नाहीत. कितीही रोजे पाळले, तरी धर्मांधांच्या दृष्टीने हे वनअधिकारी ‘काफीर’च असणार, हे हिंदूंना कधी कळणार ?

(म्हणे) ‘फलज्योतिष हे एक थोतांड !’ – अंनिस

हिंदु धर्मातील फलज्योतिष हे शास्त्र आहे; परंतु सोयीनुसार एखाद्या शास्त्राला आव्हान देऊन ते थोतांड असल्याची बोंब ठोकणे हाच मुळात अंनिसचा थोतांडपणा नव्हे काय ?

अयोध्येतील श्री सीताराम मंदिरामध्ये सलग तिसर्‍या वर्षी इफ्तार पार्टीचे आयोजन

हिंदूंच्या दिवाळी, दसरा आदी सणांच्या वेळी देहलीच्या जामा मशिदीमध्ये, अजमेरच्या दर्ग्यामध्ये किंवा मुंबईतील माहिमच्या चर्चमध्ये एखादी मेजवानी आयोजित का करण्यात येत नाही ? नेहमी हिंदूंनीच असा प्रयत्न का केला पाहिजे ? अन्यांना धार्मिक सौहार्द का दाखवावासा वाटत नाही ?

(म्हणे) ‘हिंदु’ शब्द मोगलांच्या आधी अस्तित्वातच नव्हता !’ – कमल हसन

ब्रिटिशांनी जेव्हा देशावर राज्य केले, तेव्हा त्यांनी ‘हिंदु’ हा शब्द प्रचलित केला. त्या शब्दाचा प्रयोग करण्यापेक्षा आपण ‘भारतीय’ असेच एकमेकांना संबोधित केले पाहिजे, अशी मुक्ताफळे अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम या पक्षाचे प्रमुख कमल हसन यांनी उधळली आहेत.

राजस्थानच्या सरकारी रुग्णालयातील प्रसुतीकक्षात गायत्री मंत्र लावण्यास मुसलमानांचा विरोध

हिंदूंच्या धार्मिक मंत्रांचा चांगला परिणाम होत असतांना केवळ धार्मिक कारणावरून त्याला विरोध करणारे हिंदुद्वेषीच होत ! धर्मनिरपेक्ष देशात दिवसातून ५ वेळा मशिदींवरील भोंग्यांवरून सर्व धर्मियांना अजान कशाला ऐकवली जाते ? मुसलमान लगेच हिंदूंच्या मंत्रांना विरोध करतात; मात्र किती हिंदू मशिदींवरून होणार्‍या अजानचा विरोध करतात ?


Multi Language |Offline reading | PDF