धर्मनिरपेक्ष लोकशाहीची थट्टा !

बंगालच्या राजकीय रणधुमाळीने किती खालचा स्तर गाठला आहे. ही लोकशाहीची थट्टाच असून जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करून नव्हे, तर धर्माधारित मते मागून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न होणे, हे पूर्णत: निषेधार्हच आहे.

महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे?

अशा वेळी स्वतःचे रक्षण करण्यासह देशाचे रक्षण करण्याचे दायित्व समाजावर असणार आहे. विशेषतः हिंदूंना यासाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे. याविषयी कोणती सतर्कता बाळगायला हवी, पूर्वनियोजन म्हणून काय करायला हवे, आदी गोष्टीची माहिती या लेखात देण्यात आली आहे.

‘इशरत’चा अंत !

इशरत जहाँ प्रकरणासंबंधी निकालातून जिहादी आतंकवादाला पाठीशी घालणार्‍या काँग्रेसच्या भारतविरोधी पापावर ‘पुन्हा एकदा’ शिक्कामोर्तब झाले नि ‘इशरत’चा अंत झाला, असे म्हणायला आता अडचण नाही. अर्थात् यानिमित्ताने जनतेने भारतद्वेष्ट्या काँग्रेसला जाब विचारला पाहिजे.

ईश्‍वरी गुण आणि अवगुण तसेच अलंकार !

ईश्‍वराचे जास्तीतजास्त गुण असलेल्या आणि ईश्‍वराशी एकरूप असलेल्या जिवाला ईश्‍वर सूक्ष्मातील सगळ्यात जास्त अलंकार प्राप्त करून देतो.

(म्हणे) ‘भारतातील ३० टक्के मुसलमान संघटित झाले, ४ नवीन पाकिस्तान बनतील !’

केंद्र सरकारने तात्काळ केंद्रीय अन्वेषण यंत्रणांच्या माध्यमांतून शेख आलम यांच्यावर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबावे, असेच हिंदूंना वाटते ! आलम यांच्या या विचारांच्या मागे कोणते षड्यंत्र आहे का, याचाही शोध घ्यावा.

बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची संपत्ती ५ वर्षांत १ लाखाहून थेट ४१ लाखांवर पोचली !

असा ‘चमत्कार’ भारतात राजकारण्यांच्या संदर्भात नेहमीच होत असतो आणि जनतेलाही ते अपेक्षित असते ! जर असे झाले नाही, तर ते आश्‍चर्यच ठरते ! असे ‘चमत्कार’ रोखण्यासाठी धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था हवी !

सद्दाम हुसेन आणि गद्दाफी हेही निवडणुका जिंकत होते; पण तेथे लोकशाही होती, असे नाही ! – राहुल गांधी यांची केंद्रातील भाजप सरकारवर टीका

विदेशी विश्‍वविद्यालयाने ‘ऑनलाईन’ आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘भारतात लोकशाही नाही’, असे चित्र उभे करून भारताची मानहानी करणारे राहुल गांधी !

आणीबाणी आणि काँग्रेस !

‘मोदी सत्तेत आल्यापासून भारतात असहिष्णुता वाढली आहे’, ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आली आहे’, अशा आवया उठवल्या जातात. राष्ट्रहितासाठी अशी कठोर पावले उचलली, तर ती असहिष्णुता कशी ? इंदिरा गांधी यांनी त्यांचे विरोधक वरचढ होऊ नयेत, यासाठी आणीबाणी लागू केली. यात राष्ट्रहित नव्हे, तर त्यांचा स्वार्थ होता.

मुंबईतील कराची बेकरीची शाखा बंद !

७४ वर्षे शत्रूराष्ट्राच्या राजधानीचे नाव देऊन आणि दुकानांच्या अनेक शाखा निर्माण करून मुसलमान पैसे कमावू शकतात, असे केवळ भारतातच होऊ शकते !

केरळमधील मुसलमानबहुल ‘मलबार’ भागाला स्वतंत्र राज्य बनवण्याची इस्लामी संघटनेची मागणी !

जर मुसलमानबहुल भागाचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची मागणी होत असेल, तर बहुसंख्य हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्याची मागणी केली, तर ती चुकीची कशी ?