हिंदु धर्माच्या विरोधात विधान केल्याच्या प्रकरणी प्रा. भगवान यांना न्यायालयाकडून समन्स

अधिवक्त्या सौ. मीरा राघवेंद्र यांच्याकडून फौजदारी खटला प्रविष्ट !

हिंदु धर्माच्या रक्षणासाठी कृतीशील होणार्‍या अधिवक्त्या सौ. मीरा राघवेंद्र यांच्याकडून सर्वत्रच्या अधिवक्त्यांनी आदर्श घ्यावा !

प्रा. भगवान

मैसुरू (कर्नाटक) – हिंदु धर्मच नाही. वेद, पुराण, संस्कृत यात कुठेही हिंदु शब्दाचा उल्लेख नाही. आता सांगत असलेला हा धर्म ब्राह्मणांचा धर्म आहे. मनुस्मृतीत क्षुद्र हे ब्राह्मणांचे गुलाम आहेत, वैश्य त्यांची मुले, असा उल्लेख आहे. हे स्वीकारायचे ? त्याचा स्वीकार करणे म्हणजे आपल्या स्वाभिमानाला धक्का ! त्यासाठी त्याचा बहिष्कार करा, असे आवाहन प्रा. के.एस्. भगवान यांनी यांनी येथे एका कार्यक्रमात केले होते. याविरोधात बेंगळुरू उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या सौ. मीरा राघवेंद्र यांनी बेंगळुरू महानगर दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी खटला प्रविष्ट केला आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता ५०५, २९८ अंतर्गत खटला प्रविष्ट करण्यात आला आहे. यानंतर न्यायालयाकडून प्रा. भगवान यांना समन्स बजावण्यात आले आहे.