चिनी हस्तक्षेप !

गेल्या काही दिवसांपासून नेपाळमध्ये राजकीय धुमशान चालू आहे. नेपाळचे सध्याचे कम्युनिस्ट पक्षाचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांचे सरकार वाचवण्यासाठी चीनने मैदानात उघडपणे उडी घेतली आहे.

‘जित्याची खोड…!’

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी केलेल्या चर्चेनंतर गेल्या एक मासाहून अधिक काळ सीमेवर संघर्ष करत असलेल्या चीनने अखेर २ कि.मी. सैन्य मागे घेतले.

पाकमधील मंदिरे असुरक्षित !

पाकचा हिंदुद्वेषी इतिहास पहाता तेथील कट्टर धर्मांधांनी श्रीकृष्ण मंदिर पाडल्याविषयी कुणालाच काही नवल वाटले नसावे. प्रश्‍न इतकाच आहे की, हिंदूंनी ते केवळ हिंदु आहेत; म्हणून इस्लामी राजवट असलेल्या पाकमधील हा अन्याय कुठवर सहन करायचा ?

मार्क्सवाद कि एकाधिकारवाद !

रशियाच्या संसदेत संमत झालेल्या घटनादुरुस्तीनुसार रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे वर्ष २०३६ पर्यंत या पदावर रहातील. पुतीन यांचा कार्यकाळ वर्ष २०२४ मध्ये संपणार होता. त्यांना दोनदा म्हणजे १२ वर्षे कार्यकाळ वाढवून मिळाला आहे.

काँग्रेसचा राष्ट्रद्वेष !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ दिवसांपूर्वीच समुद्रसपाटीपासून ११ सहस्र फूट उंचावरील लेह येथे चीनने निर्माण केलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर तैनात केलेल्या सैन्याला भेट देऊन त्यांचे मनोधैर्य उंचावले.

भवतारक या गुरुपादुका !

द्रष्टे संत आणि भविष्यवेत्ते यांनी सूचित केलेल्या आपत्काळाला आरंभ झाला आहे. आपत्काळ म्हणजे संकटकाळ ! अतीवृष्टी, काही ठिकाणी पाण्याची भीषण टंचाई, चक्रीवादळ, भूकंप, वणवा, टोळधाड, विजा पडणे यांसारख्या नैसर्गिक आपत्तींनी गेल्या काही मासांत भीषण रूप धारण केले आहे.

राज्य कायद्याचे कि गुंडांचे ?

पोलिसांवर होणारी आक्रमणे हा देशासाठी नवीन विषय राहिलेला नाही. कुणीही येतो आणि पोलिसांवर हात उगारतो किंवा गोळी झाडतो. आतापर्यंतच्या अशा स्वरूपाच्या घटना सर्वविदित आहेत.

‘राजा’च्या आगमनाची आस !

महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट असल्यामुळे या वर्षी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय ‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’ने घेतला आहे. हा निर्णय धक्कादायक आहे; कारण ज्या हेतूने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास आरंभ झाला, त्या हेतूलाच बगल देण्याचा हा निर्णय आहे.

आक्रमण आणि आतंकवाद !

पाकिस्तानच्या कराची येथील स्टॉक एक्सचेंजवर २९ जून या दिवशी ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’च्या (बी.एल्.ए.च्या) सैनिकांनी आक्रमण केले. यात ५ पोलीस ठार झाले. पाकने याला ‘आतंकवादी आक्रमण’ म्हटले आणि त्यामागे भारताचा हात असल्याचा आरोप केला.

…मातृभाषेशी वैर का ?

भारताची आध्यात्मिक राजधानी काशी क्षेत्र असणार्‍या या राज्यात खरे तर संस्कृतप्रधानता अधिक असणे अपेक्षित होते; परंतु तसे नाही. येथे सामान्य कुटुंबात धर्माचरण आणि धार्मिक परंपरा यांना महत्त्व आहे; परंतु अन्य प्रगत राज्यांप्रमाणे येथील सुशिक्षित लोकांमध्ये पाश्‍चात्त्य संस्कृतीचा पगडाही अधिक आहे.