‘शरीयत’चा मनमानीपणा रोखा !

जर शरीयतनुसार न्यायनिवाड्याची प्रक्रिया चालू करायची असेल, तर ‘भारतात हिंदु धर्मानुसारही न्यायनिवाडा केला जावा’, अशी मागणी हिंदुनी उद्या केली तर . . . ! सर्वांना समान वागणूक आणि अचूक न्याय मिळवून देणारी हिंदु धर्मातील न्यायप्रक्रिया म्हणूनच खर्‍या अर्थाने आदर्श मानली जाते. तिचा अवलंब होणे ही सध्याच्या काळाची आवश्यकता आहे.

काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंदिरांचे सोने घेण्याच्या मागणीस धर्माभिमानी हिंदूंचा ट्विटरवरून विरोध

त्यांच्या विरोधात धर्माभिमानी हिंदूंनी ट्विटरच्या माध्यमांतून प्रतिक्रिया व्यक्त केल्या. धर्माभिमानी हिंदूंनी   #CongressEyesTemplesGold हा हॅशटॅग बनवून त्याद्वारे विरोध चालू केला आहे. हा ट्रेंड राष्ट्रीय ट्रेंडमध्ये ८ व्या स्थानावर होता आणि त्यावर ३५ सहस्रांहून अधिक ट्वीट करण्यात आले. यात अनेकांनी काँग्रेसवर टीका केली.