प्रसिद्धीमाध्यमांचे हिंदुविरोधी कथानक (नॅरेटिव्ह) जाणा !

पुरोगामी आणि साम्यवादी यांच्या कार्यकर्त्यांची अत्यल्प उपस्थिती असूनही प्रसिद्धीमाध्यमांनी या वृत्ताला मोठी प्रसिद्धी दिली.

खर्ची खू (ता. एरंडोल) येथे ‘हिंदुराष्ट्र खर्ची खू’ फलकाचे अनावरण !

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील हिंदु धर्मप्रेमींनी विशेष प्रयत्न केले. गावातील सरपंच, उपसरपंच, तसेच प्रतिष्ठित नागरिक आणि महिला या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ विरार येथे २१ मार्चला ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन !

२१ मार्च या दिवशी विष्णुप्रतिभा बँक्वेट सभागृह, उत्कर्ष विद्यालयासमोर, विरार (प.) येथे ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशना’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा आरंभ सकाळी ९.३० वाजता होईल.

हिंदूंचे प्रभावी संघटन उभे करा आणि हिंदुत्वाच्या सूत्रासाठी कार्य करा ! – टी. राजासिंह, आमदार, तेलंगाणा

हिंदुत्वाचे कार्य मग ते कोणत्याही संघटनेचे असो, त्यात एक हिंदु म्हणून सहभागी व्हा. यापुढील काळात देशात गृहयुद्धासारखी स्थिती होऊ शकते, अशी स्थिती आहे.

मंदिरांचे संरक्षण, संवर्धन आणि संघटन यांसाठी सातारा येथे मंदिर न्यास अधिवेशनाचे आयोजन !

या अधिवेशनामध्ये मंदिरे सनातन धर्म प्रचाराची केंद्रे बनवणे, मंदिरांचे पावित्र्य राखणे, मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करणे, मंदिरांच्या भूमींवरील अतिक्रमणे हटवणे, वक्फ कायद्याद्वारे मंदिरांच्या भूमी बळकवणार्‍यांवर प्रतिबंध करणे यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत.

धर्माचरण हाच ‘लव्ह जिहाद’वर उपाय ! – कु. क्रांती पेटकर, रणरागिणी शाखा, पुणे

राजमाता जिजाऊ, महाराणी येसूबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई, महाराणी पद्मावती, अहिल्याबाई होळकर अशा अनेक महिलांचा शौर्यशाली इतिहास आपल्याला लाभला आहे.

Kolhapur Fight For Chhatrapati Shivaji Maharaj University : ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असा नामविस्तार झालाच पाहिजे !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंतीच्या दिवशी आयोजित या मोर्चाद्वारे १० सहस्रांहून अधिक हिंदूंनी एकमुखाने ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असा नामविस्तार झालाच पाहिजे’, अशी जोरदार मागणी केली.

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने जळगाव येथे जिल्हास्तरीय मंदिर अधिवेशन !

जळगावचे ग्रामदैवत प्रभु श्रीराम यांना श्रीफळ अर्पण !

निसर्गाचा र्‍हास नव्हे, तर त्याचे संरक्षण झाले पाहिजे ! – आमदार भीमराव अण्णा तापकीर, भाजप

धूलिवंदनाच्या दिवशी जलाशयाचे संरक्षण होण्याच्या  उद्देशाने गेली २२ वर्षे हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते खडकवासला जलाशयाच्या भोवती मानवी साखळी करून उभे रहातात. धरणाच्या पाण्यात कुणी उतरू नये, तसेच पाण्याचे प्रदूषण होऊ नये यांसाठी समिती निःस्वार्थपणे हे कार्य करत आहे.

‘शिवाजी विद्यापिठा’च्या नामविस्तारासाठी १७ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर हिंदूंचा भव्य मोर्चा धडकणार !

‘‘या मोर्चासाठी विविध गडदुर्गप्रेमी, संघटना, मर्दानी खेळाशी संबंधित मंडळे, कार्यकर्ते, इतिहास संशोधक-अभ्यासक यांचा मोठा प्रतिसाद आहे. या मोर्चासाठी राज्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात असलेल्या मावळ्यांचे वंशज उपस्थित रहाणार आहेत.’’