२५ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालय देणार निर्णय  

राज्यघटनेच्या प्रस्तावनेतील ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ शब्द हटवण्याची मागणी

नवी देहली – भाजपचे ज्येष्ठ नेते असणारे माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी, सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन आणि इतर यांनी राज्यघटनेतील प्रस्तावनेत असलेले ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ हे शब्द काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे. यावर झालेल्या सुनावण्यानंतर आता न्यायालय येत्या २५ नोव्हेंबरला निर्णय देणार आहे. आणीबाणीच्या काळात वर्ष १९७६ मध्ये इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वातील सरकारद्वारे करण्यात आलेल्या ४२ व्या घटनादुरुस्तीत राज्यघटनेतील प्रस्तावनेत ‘समाजवादी’, ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘अखंडता’ या शब्दांचा समावेश करण्यात आला होता.

२२ नोव्हेंबरला झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने म्हटले की, आणीबाणीच्या काळात संसदेने जे काही केले ते निरर्थक ठरविण्याच्या संदर्भात काही सांगता येत नाही. संबंधित दुरुस्तीचा (४२वी दुरुस्तीचा) या न्यायालयानद्वारे अनेक वेळा आढावा घेण्यात आला  आहे.