शिवपिंडीला अर्धी प्रदक्षिणा घालण्यामागील धर्मशास्त्र !
भगवान शिवाला चंद्रकलेप्रमाणे म्हणजेच सोमसूत्री प्रदक्षिणा घातली जाते. ‘चंद्राचा अर्थ आहे ‘सोम’ आणि ‘सूत्र’ म्हणजे ‘नाला’. अरघापासून उत्तर दिशेला म्हणजेच सोमाच्या दिशेकडे जे सूत्र जाते, त्याला सोमसूत्र किंवा जलप्रणालिका असे म्हटले जाते.