‘गोवा कर्मचारी भरती आयोगा’च्या माध्यमातून २ सहस्र सरकारी पदांची भरती होणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
‘गोवा कर्मचारी भरती आयोग’ लवकरच राज्यशासनातील १ सहस्र ९२५ पदांसाठी भरती प्रक्रियेला प्रारंभ करणार आहे. यासंबंधीचे विज्ञापन लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शक असणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.