अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २४ आणि २५ फेब्रुवारी या दिवशी भारताच्या दौर्‍यावर येणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २४ आणि २५ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी भारताच्या दौर्‍यावर येणार आहेत, अशा आशयाचं ट्वीट अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांचे निवास आणि कार्यालय असणार्‍या  व्हाईट हाऊसने केले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा महाभियोग खटल्यात विजय

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात चालू असलेल्या महाभियोगामध्ये विजय झाला आहे. गेल्या २ आठवड्यांपासून चालू असलेल्या महाभियोगात ट्रम्प यांच्या विरोधात जे आरोप करण्यात आले होते, ते अमेरिकन सिनेटने फेटाळून लावत त्यांना निर्दोष मुक्त केले आहे.